जुमलेबाजांना उखडून फेका - विखे पाटील

Radhakrishna-Vikhe-Patil
Radhakrishna-Vikhe-Patil

चिमूर (चंद्रपूर) - भाजपच्या जनविरोधी व खोटारड्या सरकारला जनता विटली आहे. पराभवाची जाणीव झाली आहे. त्यामुळे त्यांची भाषा बदललेली आहे. मात्र, आता जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. या जुमलेबाजांची सत्ता उलथवून टाका, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जनसंघर्ष यात्रेदरम्यान येथे आयोजित जाहीर सभेत केले.

येथील न्यू राष्ट्रीय प्रेरणा कॉन्व्हेंटच्या प्रांगणात या सभेचे आयोजन करण्यात आले. मंचावर राज्याचे सहप्रभारी आशीष दुवा, विधानसभेतील उपगटनेते विजय वडेट्टीवार, राजेंद्र मुळक, आमदार डॉ. आशीष देशमुख, माजी खासदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर, माजी आमदार सेवक वाघाये, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश वारजूकर, श्‍याम उमरकर, रामकृष्ण ओझा, किशोर गजभे, शाह आलम शेख, अमित कारंडे, शकुर नागाणी, विशाल मुत्तेमवार, डॉ. नारायण किरसान, ममता डुकरे, गजानन बुटके, नगराध्यक्ष गोपाल झाडे, आदींची उपस्थिती होती. 

संचालन प्रा. राम राऊत, प्रास्ताविक डॉ. सतीश वारजूकर व आभार काँग्रेस तालुकाध्यक्ष माधव बिरजे यांनी केले.

३१ सरपंचांचा प्रवेश
चिमूर तालुक्‍यातील ३१ सरपंच आणि ४ उपसरपंच यांनी आज जनसंघर्ष यात्रेच्या जाहीर सभेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चिमूर नगर परिषदेचे उपाध्यक्ष तुषार शिंदे व जयश्री निवटे यांनीही विखे-पाटील उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

सरकारला जागा दाखवा! 
भंडारा : केंद्र व राज्यातील भाजप सरकार जुमलेबाज आहे. केवळ खोटे आश्‍वासन देऊन शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांची फसवणूक करीत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. मावा, तुडतुड्याची मदत मिळाली नाही. जिल्ह्यातील धानउत्पादक शेतकरी दुष्काळाचे चटके सहन करीत आहेत. परंतु, सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नाही. यामुळे अशा फसवणूक करणाऱ्या धोखेबाज सरकारला आगामी निवडणुकीत जागा दाखवा, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात राज्यात जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली. ही यात्रा शनिवारी, जिल्ह्यात पोहोचली. श्री. विखे-पाटील म्हणाले, साडेचार वर्षांत भाजप सरकारने केवळ घोषणाबाजी करून जनतेची फसवणूक केली. प्रत्यक्षात कोणतीही ठोस अंमलबजावणी केली नाही. काँग्रेस सत्तेत येताच प्रतिक्विंटल २,५०० रुपये धानाला भाव देऊ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com