हॉटेलचे शटर बाहेरून होते बंद मात्र आतमध्ये होते ग्राहक! प्रशासनाने आकारला दंड

rajura.
rajura.
Updated on

राजुरा(जि.चंद्रपूर) : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासन कठोर पावले उचलत आहे. या काळात हॉठेल, ढाबे, रेस्टॉसेंट्‌स बंद ठेवण्याचे शासन आदेश आहेत. या काळात शासनाने केवळ पार्सलला परवानगी दिली होती, मात्र कोरानाचे गांभीर्य लक्षात न घेणारे अनेकजण पैशासाठी शासनाचे आदेश डावलून आपला व इतरांचाही जीव धोक्‍यात घालत आहेत. त्यामुळे शासनाच्या अडचणींमध्ये अधिक वाढ होत आहे. आणि कोरानाच्या संसर्गाला अटकाव करण्याच्या प्रयत्नाला हरताळ फासला जात आहे.
अशीच घटना राजुरा येथील नागराज हॉटेलात घडली. शासनाचे आदेश डावलून हॉटेल मालकाने ग्राहकांना शटर बंद करून नाश्‍ता देणे सुरू ठेवले होते. मालकाला हे कृत्य चांगलेच महागात पडले आहे. शहरातील मुख्य मार्गावरील नागराज कॅफे हॉटेलात बाहेरून शटर बंद करून काही लोकांना नाश्‍ता करताना रंगेहात पकडण्यात आल्यामुळे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी कॅफे मालकांवर दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही कारवाई दिनांक 1 जून ला सकाळी साडेदहाच्या सुमारास करण्यात आली. शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या नागराज कॅफेमध्ये ग्राहक नाश्‍ता करीत असल्याची माहिती मुख्याधिकारी यांना मिळाली. माहिती मिळताच स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता संकेत नंदवंशी यांच्या मार्गदर्शनात सुरेश पुणेकर व राजू लांडगे यांनी नागराज कॅफे हॉटेल गाठले. आणि मालकाकडे या प्रकाराबद्दल चौकशी केली, सुरुवातीला हॉटेल मालकाने आरोप नाकारला. मात्र ग्राहक नाश्‍ता करत असल्याच्या फोटांचा पुरावा दाखवल्यानंतर त्यांनी आपली चूक मान्य केली व दोन हजार रुपयाचा दंड भरला.

कोविड संकटात हॉटेल व्यवसायिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य व स्वच्छता विभागाचे अभियंता संकेत नंदवंशी यांनी केले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com