औषध दुकानांवर छापे; ‘एफडीआय’ची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

नागपूर - अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने मंगळवारी शहरातील खासगी इस्पितळांशी संलग्न असलेल्या औषधांच्या दुकानांवर छापा टाकल्याने खळबळ उडाली आहे. यात मोठ्या प्रमाणात गर्भनिरोधक गोळ्यांचा बेकायदेशीर साठा आढळून आल्याचे समजते. मात्र, विभागाने यास नकार दिला असून नियमित तपासणी केल्याचे सांगितले. 

औषध प्रशासन विभागाच्या पथकाने मंगळवारी शहरातील अनेक बड्या इस्पितळांशी संलग्न असलेल्या औषध दुकानांची तपासणी केली. दुकानातील औषधांचा साठा तसेच खरेदी-विक्रीचे बिल तपासले. काही दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली. याशिवाय गर्भनिरोधक गोळ्यांचाही साठा आढळला. त्यामुळे दुकान लगेच बंद करण्याचे निर्देश दिले. ही कारवाई अतिशय गोपनीय पद्धतीने करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत संबंधित विभागाचे अधिकारी धाडी टाकल्याचे सांगण्यास नकार देत होते. 

त्यानंतर नियमित तपासणी केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कारवाई दडपण्यात आल्याची चर्चा आहे.

Web Title: Raid on Medical FDI crime