अंबाझरीतील ऑनलाइन सेक्‍स रॅकेटवर छापा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

नागपूर - इंटरनेटवरून ऑनलाइन एस्कॉर्ट सर्व्हिस देऊन सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखेने छापा घातला. छाप्यात पश्‍चिम बंगालच्या दलालास अटक केली. देहव्यापाराच्या दलदलीत अडकलेली गुजरातच्या २३ वर्षीय तरुणीला ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी सायंकाळी केली.

नागपूर - इंटरनेटवरून ऑनलाइन एस्कॉर्ट सर्व्हिस देऊन सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखेने छापा घातला. छाप्यात पश्‍चिम बंगालच्या दलालास अटक केली. देहव्यापाराच्या दलदलीत अडकलेली गुजरातच्या २३ वर्षीय तरुणीला ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी सायंकाळी केली.

शंकर ऊर्फ सुधीर रामपद घोष (५२, रा. बबुलागाव, हसकाली. जि. नंदिया-पश्‍चिम बंगाल) हा उपराजधानीत पश्‍चिम बंगाल व गुजरात राज्यातील तरुणींचा देहव्यापारासाठी वापर करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्‍त संभाजी कदम यांना मिळाली. फुटाळा, अमरावती रोडवर युवतींना उभे करून तो थेट आंबटशौकीनांशी सौदा करीत होता. कदम यांनी सोमवारी सायंकाळी पंटर पाठविला. मोठी रक्‍कम देऊन सुधीर घोष याने सौदा केला.

तरुणीला लॉजवर जाण्यास सांगितले. दबा धरून बसलेल्या पोलिसांनी सुधीरला अटक केली तसेच युवतीला ताब्यात घेतले. अंबाझरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात सुरू असलेल्या देहव्यापाराचा पर्दाफाश करणारी वृत्तमालिका ‘सकाळ’ने प्रकाशित केल्यानंतर महिनाभरात १८ पेक्षा जास्त सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखेने छापे घातले आहेत.

मोठे नेटवर्क उद्‌ध्वस्त
सुधीर घोष हा मोठा दलाल आहे. त्याच्याकडे गुजरात, जम्मू-काश्‍मीर, कोलकाता, ओडिशा, चेन्नई, आसाम, पंजाब येथील तरुणी देहव्यवसायासाठी संपर्कात आहे. सुधीर देहव्यापारच्या पैशावर विमानाने वारी करतो. अन्य राज्यांतील मुलींना नागपुरात बोलावून त्यांना मोठमोठ्या हॉटेलमध्ये ठेवतो. तरुणींना थेट फुटाळा, सीताबर्डीतील मॉल, अंबाझरी आणि अमरावती रोडवर व्यवसायासाठी पाठवतो. त्यानंतर ऑनलाइनवरून ग्राहकाला कारमध्ये पाठवून लाखो रुपये कमावतो.

Web Title: Raid on Online Sex Racket Crime