नोकरीवरून काढल्याने रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या

अनिल कांबळे
सोमवार, 18 जून 2018

हुडकेश्‍वर : रेल्वे विभागात लिपीक पदावर असलेल्या एका
 कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढल्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 
त्याचा उपचारादरम्यान रविवारी (ता. 17) रात्री मृत्यू झाला. रविंद्र संतोषराव ढोक
(वय 42) असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. रविंद्र ढोक हे पत्नी व दोन मुलांसह हुडकेश्‍वरमधील लाडीकर लेआउट, संतनामदेव नगरात राहत होते. ते नागपूर रेल्वे कार्यालयात लिपिक पदावर नोकरीकरीत होते.

गेल्या काही दिवसांपासून कामाचा ताण वाढल्याने ते तणावात होते. त्यामुळे त्यांना दारूचे व्यसन जडले. नोकरीवरून घरी आल्यानंतर घरातीलही वातावरण बदलले होते. चिडका स्वभावामुळे मुलेही दूर राहत होती.  मात्र, पत्नीने त्यांची समजूत घातली. शेवटी त्यांना रेल्वे प्रशासनाने नोकरीतून काढून टाकले. निराशेच्या गर्तेत ते रविवारी सायंकाळी घरी आले. नोकरीवरून काढल्याचे पत्नीला सांगितले. घरात गेले आणि विष पिऊन
 आत्महत्येचा प्रयत्न केला. पत्नीच्या लक्षात येताच त्यांनी दार ठोठावले. परंतू प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना आवाज दिला.रविंद्र यांना मेडिकल रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

मुलांचे भविष्य अन्‌ विषाची बाटली

नोकरीवरून काढल्यामुळे ते नैराश्‍यात होते. पत्नीने त्यांची समजूत घालूनएखादा व्यवसाय थाटण्याचा सल्ला दिला. मात्र, दोन्ही मुलांचे भविष्य णि कुटूंबाचा भार पाहता मनाने खचलेल्या रविंद्र यांनी शेवटचा निर्णय घेतला. भविष्य अंधकारमय दिसत असल्यामुळे त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली.

Web Title: Railway staff suicide due to removal from job