रेल्वेरुळाला गेला तडा, मोठा अपघात टळला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

चंद्रपूर : घोडपेठजवळ रेल्वेरुळाला तडा गेला. ही बाब रेल्वे प्रशासनाच्या वेळीच लक्षात आल्याने या मार्गावरून धावणारी हैदराबाद-नवी दिल्ली तेलंगण एक्‍स्प्रेस थांबविण्यात आली. त्यामुळे मोठा अपघात टळला. आज, मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार उघडकीला आला. सुमारे अर्धा-पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर रेल्वेगाडी पुढील प्रवासाला निघाली.

आज दुपारच्या सुमारास घोडपेठजवळ रेल्वेरुळाला तडा गेल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी त्याच वेळेला येत असलेली हैदराबाद-नवी दिल्ली तेलंगण एक्‍स्प्रेस गाडीला थांबण्याची सूचना केली. परंतु, तोपर्यंत गाडीच्या अर्ध्या डब्यांनी तुटलेला रूळ पार केला होता. रेल्वे कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करीत रूळ जोडले. त्यानंतर रेल्वे पुढील प्रवासाला निघाली. याच मार्गाने धावणारी बल्लारशाह-भुसावळ पॅसेंजर अर्धा तास उशिराने सोडण्यात आली.

Web Title: railway track breakage