रेल्वे वाहतूक विस्कळीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रायपूर मंडळातील सिलियारी-मांढर रेल्वेस्थानकादरम्यान रविवारी पहाटे 4.45 वाजताच्या सुमारास मालगाडीचा एक डबा रेल्वेरुळावरून घसरला. या अपघातामुळे हावडा मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. रविवारी नागपूरकडे येणाऱ्या 10 गाड्या विलंबाने धावत होत्या. शिवाय नागपूर-बिलासपूर एक्‍स्प्रेस रायपूरपुढे रद्द करण्यात आली आहे.

मुख्य मार्गावरच मालगाडी घसरल्याने अप लाइन प्रभावित झाली, तर डाउन लाइनवरून एकेरी मार्गाने रेल्वेगाड्यांची वाहतूक सुरू होती. या मार्गावरून रविवारी सुटणारी गाडी क्रमांक 12856 नागपूर-बिलासपूर एक्‍स्प्रेसला रायपूर रेल्वेस्थानकावरच संपविण्यात आले. येथूनच ही गाडी बिलासपूर-नागपूर इंटरसिटी बनून नागपूरकडे रवाना झाली. म्हणजेच ही गाडी रायपूर-बिलासपूरदरम्यान रद्द आहे. एकेरी वाहतूक सुरू असल्याने गाड्यांच्या वेगावर मर्यादा आली आहे. परिणामी हावड्याकडून नागपूरला येणारी गाडी क्रमांक 18030 शालिमार-एलटीटी एक्‍स्प्रेस 4 तास, 12810 हावडा-मुंबई मेल 2.45 तास, 13425 मालदा-सुरत 3.30 तास, 12130 हावडा-चक्रधरपूर आझाद हिंद एक्‍स्प्रेस 3.20 तास, 12906 हावडा-पोरंबदर एक्‍स्प्रेस 3.20 तास, 12152 हावडा-बंकरा समरसता एक्‍स्प्रेस 1 तास, 12296 पाटीलपुत्र- अहमदाबाद संघमित्रा एक्‍स्प्रेस 3 तास आणि 12834 हावडा-आदिलाबाद एक्‍स्प्रेस 1 तास उशिराने धावत होती. सायंकाळपर्यंत एकाच मार्गाने वाहतूक सुरू असल्याने यामार्गावरून हावडाच्या दिशेने जाणाऱ्या गाड्याही विलंबाने धावत आहेत.

सोमवारीसुद्धा या मार्गावरील वाहतूक प्रभावित राहण्याची शक्‍यता आहे. रेल्वेगाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. रविवारी रेल्वेस्थानकावर एरवीपेक्षा प्रवाशांची अधिक गर्दी दिसून आली. प्रतीक्षालयांमध्ये गर्दी असल्याने अनेकांना फलाटावर उभे राहूनच गाड्यांची वाट बघावी लागली.

Web Title: railway transport disturbed