esakal | कोरोना काळात रेल्वेने मुंबईला जायचंय? मग ही बातमी वाचाच; रेल्वेने जाहीर केले वेळापत्रक 
sakal

बोलून बातमी शोधा

Railway will provide trains from badhnera station fpr mumbai

मुंबई-हावडा मेल (क्रमांक 02809) 24 सप्टेंबरपासून बडनेरा रेल्वे स्थानकावरून गुरुवार, शनिवार व मंगळवार असे तीन दिवस धावणार आहे. अहमदाबाद ते हावडा (गाडी क्रमांक 02833) 18 सप्टेंबरपासून शुक्रवार, सोमवार व बुधवार असे तीन दिवस बडनेरा रेल्वेस्थानकातून रवाना होईल.

कोरोना काळात रेल्वेने मुंबईला जायचंय? मग ही बातमी वाचाच; रेल्वेने जाहीर केले वेळापत्रक 

sakal_logo
By
कृष्णा लोखंडे

अमरावती :  प्रवाशांसाठी रेल्वेने आनंदाची बातमी दिली असून बडनेरा रेल्वेस्थानकावरून मुंबईसह अहमदाबाद, ओखा, गांधीधाम, भुवनेश्‍वर मार्गावरील रेल्वेगाड्या सुरू होत आहेत. राज्यातील रेल्वे मात्र अजूनही बंदच आहे. रेल्वेविभागाने या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे. त्यानुसार बडनेरा स्थानकातून पाच गाड्यांची सुविधा आहे.

मुंबई-हावडा मेल (क्रमांक 02809) 24 सप्टेंबरपासून बडनेरा रेल्वे स्थानकावरून गुरुवार, शनिवार व मंगळवार असे तीन दिवस धावणार आहे. अहमदाबाद ते हावडा (गाडी क्रमांक 02833) 18 सप्टेंबरपासून शुक्रवार, सोमवार व बुधवार असे तीन दिवस बडनेरा रेल्वेस्थानकातून रवाना होईल. हावडा ते अहमदाबाद (क्रमांक 02834) गाडी बडनेरा रेल्वेस्थानक येथून बुधवार, सोमवार व शनिवार असे तीन दिवस धावेल.

क्लिक करा - CBI, CID, NIA आणि  IB मध्ये नेमका फरक काय? सुशांतची केस CID कडे का दिली नाही? जाणून घ्या

ओखा ते खुर्दा रोड (क्रमांक 08402) ही गाडी आठवड्यातून एक दिवस बडनेरा रेल्वेस्थानकावरून 17 सप्टेंबरपासून गुरुवारी रवाना होईल. अहमदाबाद ते भुवनेश्‍वर (क्रमांक 08406) ही गाडी आठवड्यातून एक दिवस 14 सप्टेंबरपासून दर शनिवारी बडनेराहून रवाना होईल.

तसेच भुवनेश्‍वर ते अहमदाबाद (क्रमांक 08405) ही गाडी 16 सप्टेंबरपासून दर गुरुवारी रवाना होईल. गांधीधाम ते पुरी (क्रमांक 02973) ही गाडी आठवड्यातून एक दिवस बडनेरा स्थानकावरून गुरुवारी रवाना होईल तसेच पुरी ते गांधीधाम (क्रमांक 02974) ही गाडी आठवड्यातून एक दिवस रविवारी रवाना होईल.

खुर्दा रोड ते अहमदाबाद (क्रमांक 02843) ही गाडी आठवड्यातून चार दिवस धावणार आहे. 13 सप्टेंबरपासून बडनेराहून रविवार, बुधवार, शुक्रवार व शनिवार, असे चार दिवस ही गाडी सुरू झाली आहे.

अधिक माहितीसाठी -'डायमंड क्रॉसिंग' बघितले आहे का? देशातील एकमेव हिऱ्यासारखा दिसणारा रेल्वेमार्ग; वाचा सविस्तर

अहमदाबाद ते खुर्दा रोड (क्रमांक 02844) ही गाडी बडनेरा रेल्वेस्थानकावरून 15 सप्टेंबरपासून मंगळवार, शुक्रवार, रविवार व सोमवार असे चार दिवस रवाना होईल, अशी माहिती बडनेरा रेल्वेस्थानकाचे मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक शरद सयाम यांनी दिली. आरक्षण तिकीट घेऊनच प्रवास करावा लागेल, कोरोना नियमांचे पालन करून प्रवाशांना प्रवास करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ