वऱ्हाडात संततधार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

अकोला - तीन दिवसांपासून वऱ्हाडात पावसाने ठाण मांडलेले असून, अकोला, वाशीम जिल्ह्यात मागील 24 तासांत पावसाचा जोर कायम आहे. अकोला जिल्ह्यात सरासरी 31.2 मिलिमीटर, तर वाशीममध्ये सरासरी 35.37 मिलिमीटर पाऊस झाला. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्‍यात अतिवृष्टी झाली असून, येथे सर्वाधिक 70 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

जवळपास 20 ते 25 दिवसांच्या मोठ्या खंडानंतर सावत्रिक पावसाचे पुनरागमन झाले आहे. मागील तीन दिवसांत बुलडाण्यातील काही तालुके वगळता वऱ्हाडात सर्वदूर चांगला पाऊस झाला. मागील 24 तासांत अकोला, वाशीम जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पाऊस सुरू असून, बुधवारी दिवसभर पाऊस कोसळत होता. संततधार पावसामुळे शेतीतील सर्व कामे आता ठप्प झाली आहेत. सर्वत्र पाण्यामुळे पेरणीची कामे रखडली आहेत. बुलडाणा जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते.

पावसामुळे जलयुक्तची कामे तुडुंब
मागील तीन दिवसांतील पावसाचा चांगला फायदा पिकांना जसा झाला, तसाच फायदा या वर्षात झालेल्या जलयुक्तच्या कामांनाही झाला आहे. बंधारे, चर, पाण्याने तुडुंब भरू लागले आहेत. दररोज हजारो लिटर पाणी जमिनीत जिरत आहे.

Web Title: rain in akola