esakal | गोंदियात होळी आणि रंगपंचमीचा उत्साहच हिरावला...वाचा काय झाले
sakal

बोलून बातमी शोधा

rain

गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात कुठे ना कुठे पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. हवामान खात्याने तसे संकेतही दिले आहेत. येत्या शुक्रवारपर्यंत (ता. ) वादळवारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असे संकेत पुन्हा हवामान खात्याने दिले आहेत.

गोंदियात होळी आणि रंगपंचमीचा उत्साहच हिरावला...वाचा काय झाले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोंदिया : होळीचे दिवस येऊनही यंदा पाऊस अधूनमधून हजेरी लावतच आहे. पावसाचे सावट शहरासह जिल्ह्यातील आठही तालुक्‍यात होळी व रंगपंचमीच्या दिवशी वादळवाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसाने सारे जनजीवन विस्कळीत झाले होते. होळी आणि रंगपंचमीचा उत्साह पावसाने हिरावून घेतला होता.
गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात कुठे ना कुठे पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. हवामान खात्याने तसे संकेतही दिले आहेत. येत्या शुक्रवारपर्यंत (ता. ) वादळवारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असे संकेत पुन्हा हवामान खात्याने दिले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, देवरी, आमगाव, सालेकसा तालुका वगळता अन्य तालुक्‍यांत सोमवारी (ता. 9) होळी पेटविल्यानंतर पावसाने दमदार हजेरी लावली. मंगळवारी (ता.10 ) धुलीवंदनाच्या दिवशीदेखील सायंकाळी साडेसहानंतर पावसाने अक्षरशः थैमान घातले होते.

सविस्तर वाचा - दारूच्या नशेत भाऊ चाकू घेऊन धावला आईच्या मागे, तेवढ्यात लहान भावाने केले हे...

विजांचा कडकडाट अन्‌ सोसाट्याचा वारा वाहवा अशी वाहणारी हवा, खंडित होणारा विद्युतपुरवठा यामुळे नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली. बहुतांश ठिकाणी विद्युत खांब तूटून पडल्याची तर, काही ठिकाणी झाडे कोसळल्याची माहिती आहे. अवकाळी पावसाने मात्र, रब्बी हंगाम धोक्‍यात आला असून, शेतकऱ्यांच्या तोंडाजवळ आलेला घास हिरावला आहे.