अलविदा दोस्तों, अब मैं चला! परतीच्या पावसाचा प्रवास आरंभ 

rain
rain

अमरावती ः हवामान खात्याच्या अंदाजानुसार या आठवड्यात परतीच्या पावसाचा प्रवास सुरू होणार आहे. यंदाच्या मोसमात बुलडाणा व वाशीम वगळता पश्‍चिम विदर्भातील उर्वरित तीन जिल्ह्यांत पावसाने जेमतेम सरासरी गाठली आहे. विभागात आतापर्यंत १०३ टक्के पाऊस झाला असून परतीच्या पावसासाठी पूरक वातावरण तयार होत आहे. सोमवार, २८ सप्टेंबरपासून या प्रवासाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 

गत दोन आठवड्यांपासून विभागातील विविध भागांत विजांच्या कडकडाटांसह पाऊस कोसळला. या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान केले असतानाच तूर व कपाशीलाही धक्का लावला आहे. अतिरिक्‍त पावसामुळे अमरावती, अकोला व यवतमाळमधील धरणांचे दरवाजे उघडून धरणांतील पाण्याचा विसर्ग करावा लागला. 

जून ते सप्टेंबर या पावसाच्या कालावधीत यंदा पाऊस लवकर आला. जून ते ऑगस्ट या दोन महिन्यांत पश्‍चिम विदर्भात तो प्रत्यक्ष ६१८ मिमीच्या तुलनेत ६२७ मिमी पडला. या दोन महिन्यांत त्याची सरासरी १०१ टक्के आहे. सर्वाधिक पाऊस वाशीम जिल्ह्यात ७४ मिमी तर सर्वांत कमी अकोला जिल्ह्यात ५०४ मिमी बरसला. अमरावती व यवतमाळने जेमतेम सरासरी गाठली तर बुलडाण्यात तो सरासरीपेक्षा अधिक झाला. सप्टेंबरमध्ये विभागाची पावसाची सरासरी १२३ टक्के राहिली. अकोला वगळता उर्वरित चारही जिल्ह्यांत तो दमदार राहिला. 

धरणांमधील जलपातळीत वाढ होऊन जलसाठा शंभर टक्‍क्‍यांवर पोहोचला. त्यामुळे धरणांची दरवाजे उघडावी लागली. जून ते सप्टेंबर या पावसाच्या कालावधीतील ऑगस्टमधील संततधार पावसाने खरिपातील पिकांची अपरिमित हानी झाली. सप्टेंबरमधील पावसाने त्यात भर घातली. आता परतीच्या पावसाचा प्रवास सोमवारपासून (ता.२८) सुरू होत असल्याचा अंदाज आहे.

या पावसाने आणखी किती नुकसान होईल याचा अंदमास नाही. राजस्थानच्या वायव्येपासून पावसाचा परतीचा प्रवास २८ सप्टेंबरला सुरू होईल. पावसाच्या दीर्घकालीन पूर्वानुमानानुसार ९ ते १५ ऑक्‍टोबर या आठवड्यात राज्यातील पाऊस पूर्णपणे कमी होण्याची शक्‍यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com