गडचिरोलीत वादळी वाऱ्यासह पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

गडचिरोली - जिल्हात आज अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मुलचेरा, अहेरी, भामरागड व रांगी परिसरात घरांची पळझळ झाली असून रस्त्यावर वृक्ष पडल्याने आलापल्ली-भामरागड मार्गाची वाहतुक तासभर विस्कळित झाली होती.

गड चिरोली, भामरागड व धानोऱ्या तालुक्‍यात आज सकाळी सोडेनऊ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले तर दुपारी बारा वाजताच्या दरम्यान अचानक आलेल्या वादळी पावसामुळे अहेरीत राजवाडा रोडवरील स्वयंम अपार्टमेंट जवळ जुने मोठे झाड मुळातुनच उखडून किशोर सडमेक यांचे घरावर पडले मात्र घर स्लॉपचे असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण घरावर झाड पडल्याने मात्र स्लॉपचा काही भाग शतीग्रस्त झाला.

Web Title: Rain with thunderstorms in Gadchiroli

टॅग्स