पावसाचा जोर कमी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

नागपूर : प्रादेशिक हवामान विभागाने 48 तासांत विदर्भात दिलेला अतिवृष्टीचा इशारा अपेक्षेप्रमाणे फोल ठरला. "रेड अलर्ट'नंतरही शहरात शुक्रवारी पावसाचा थेंबही पडला नाही. कमी दाबाचा पट्‌टा राजस्थानच्या दिशेने सरकल्याने आता पावसाचा जोरही कमी होणार आहे. तसे संकेत हवामान विभागाने दिले.

गुरुवारी संततधार पावसाने उपराजधानीत दमदार हजेरी लावल्यानंतर आज वरुणराजाने विश्रांती घेतली. दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, पहाटेच्या सुमारास झालेला हलका शिडकावा वगळता शहरात पावसाची एकही सर आली नाही. दुपारनंतर सूर्यनारायणाचे दर्शनही घडले. मध्य भारतावरील ढगांची दाटी लक्षात घेता हवामान विभागाने दोन दिवस विदर्भात अतिवृष्टीचा इशारा काल दिला होता. संभाव्य अतिवृष्टी लक्षात घेता महापालिका प्रशासनानेही कंबर कसली होती. मात्र, हवामान विभागाचा इशारा अखेर इशाराच ठरला. कमी दाबाचा पट्‌टा राजस्थानच्या दिशेने सरकल्याने सध्यातरी विदर्भात जोरदार पावसाची शक्‍यता कमी आहे. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहणार आहे. यादरम्यान काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरात सकाळी साडेआठपर्यंत 94 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raining