esakal | कोरोनाच्या धास्तीत अकोला, बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा ‘अवकाळी’चा तडाखा
sakal

बोलून बातमी शोधा

rain-falling-into-water.jpg

वऱ्हाडात जिल्ह्यात रब्बी पिकांचे मोठे क्षेत्र आहे. तर फळबागांचीही लागवड मोठ्याप्रमाणात आहे. बुधवारी झालेल्या पावसामळे जिल्ह्यातील रब्बी व फळबागांना मोठा फटका बसल्याची माहिती आहे.

कोरोनाच्या धास्तीत अकोला, बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा ‘अवकाळी’चा तडाखा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : वऱ्हाडात अवकाळी पावसाचे थैमान सुरूच असून पुन्हा अकोला व बुलडाणा जिल्ह्याच्या काही भागात बुधवारी (ता.25) सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊसाने हजेरी लावली. यामुळे यंदाच्या रब्बी हंगामातील उरली सुरली पिके पूर्णत: नष्ट होऊन बळीराजा पुरता ‘गार’ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

अकोला व बुलडाणा जिल्ह्यासह शहराच्या काही भागात बुधवारी मध्यम, वादळी तर हलका पाऊस झाला. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील हातरुण, बाळापूर, वल्लभनगर, शिर्ला, पातूर, अंदूरा, सस्ती, भंडारज, व्याळा, बेलूरा, आटससूल, नया अंदूरा, करंजा रमजानपूर, पंचगव्हाण, चाहगाव आदी गावांचा त्यामध्ये समावेश आहे. तर माझोड, भरतपूर, गोरेगाव, कापशी परिसरात मेघ गर्जनेसह पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागातील नागरिकांत धास्ती वाढली आहे. 

महत्त्वाची बातमी - रस्त्यावरील बेघरांसाठी महापालिकेचा बेघर निवारा खुला! 

तसेच बुलडाणा जिल्ह्यात बुलडाणा शहर व परिसर तसेच खामगाव परिसरात पावसाने हजेरी लावली. थंड वातावरणात कोरोना विषाणू जास्त काळ टिकत असल्याची पसरलेली अफवा डोकेदुखी ठरत आहे. वऱ्हाडात जिल्ह्यात रब्बी पिकांचे मोठे क्षेत्र आहे. तर फळबागांचीही लागवड मोठ्याप्रमाणात आहे. बुधवारी झालेल्या पावसामळे जिल्ह्यातील रब्बी व फळबागांना मोठा फटका बसल्याची माहिती आहे. गहू, हरभरा या पिकांचे उत्पादनही त्यामुळे कमी होणार असल्याची माहिती आहे.

शहरातही विजांचा कडकडाट
ग्रामीण क्षेत्रासह शहरातही सायंकळी 6 वाजता दरम्यान हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर वीजांचा कडकटानंतर पावसाची गती वाढली. परिणामी, काही वेळेसाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र, झालेल्या पावसामुळे कुठेही नुकसान न झाल्याची माहिती आहे.

loading image