राजुरा : अवकाळी पावसाने काढले शेतकऱ्यांचे दिवाळे

श्रीकृष्ण गोरे
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

राजुरा (जि. चंद्रपूर) : यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून संततधार पावसाची रिपरिप यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मात्र दिवाळीत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कापणीवर आलेले धान, सोयाबीनचे पीक ओले झाले आहे. पीक कापणीला आले असताना दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास हिराविल्याने शेतकऱ्याचे चांगलेच दिवाळे काढले आहे.

राजुरा (जि. चंद्रपूर) : कोरपना तालुक्‍यात परतीच्या पावसाने चांगलेच थैमान घातले. पीक कापणीला आले असताना दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास हिराविल्याने शेतकऱ्याचे चांगलेच दिवाळे काढले आहे. मागील चार पाच दिवसांपासून राजुरा, कोरपना तालुक्‍यांतील काही परिसरात मोठ्याप्रमाणात पाऊस पडला. यात शेतात उभे असलेले व कापणीला आलेले सोयाबीनचे पीक पूर्णपणे भिजले. काहींनी सोयाबीन पीक कापून जमा केलेल्या ढिगांना शेतात साचलेल्या पाण्यांनी वेढले आहे. यात सोयाबीन शेंगामध्ये अंकुर निघाले आहे; तर वेचणीला आलेल्या कपासीचे बोण्ड ओले झाले असून त्यातूनसुद्धा अंकुर निघाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्याची भरणारी रास आता खाली आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे वर्षभराचे बजेट बिघडले शेतकऱ्यांचे वर्षभऱ्याचे बजेड बिघडले आहे. आधीच फसव्या कर्जमाफीच्या अश्वासनाला बळी पडलेला शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. शासनाकडून त्यांना मदतीची
गरज आहे. आठ दिवसांपूर्वी दारोदारी जाऊन मतांचा जोगवा मागणारी नेतेमंडळी आता मात्र विधानसभा निवडणुकीच्या जय पराजयाचे गणित मांडण्यात व्यस्त आहे. पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नाही.
कोरपना तालुक्‍यातील भोयगाव येथील योगेश मोहितकार यांच्या शेतात असलेल्या सोयाबीन पिकांची कापणी केली असता परतीच्या पावसाने सर्व पीक ओले झाले. कापलेल्या सोयाबीन शेंगामध्ये अंकुर फुटले आहे तर कपाशी बोण्डमध्येसुद्धा अंकुर आल्याने मोठे नुकसान झाले आहे. मोहितकार यांच्या सारख्या शेकडो शेतकऱ्यांच्या शेतातील पीक ओले झाल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या घरी पिकांनी फुलून दिसणारी रास अश्रूंनी भरून आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

आनंदाचा व उत्सवाचा असलेला दिवाळी सण साजरा करण्याऐवजी शेतकरी वर्ग वर्षाचा आर्थिक बजेट कसा बसवायचा, या विवंचनेत आहे. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानाची लोकप्रतिनिधी, प्रशासनाने पाहणी व पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी.
- नरेश सातपुते, सरपंच (कवठाळा, ता. कोरपना)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajura : Farmers' bust removed by avkali rains