रमजानचे रोजे व ईद प्रथमच झाली घरात; कोरोनाला भारत देशातून हद्दपार होण्यासाठी विशेष दुवा

मो.मुश्ताक
सोमवार, 25 मे 2020

ज्यावेळी आपल्या भारत देशावर संकट आले त्या - त्यावेळी भारतीय मुस्लिम समाजाने त्यावर मात करीत आपल्या देशाला संकटातून मुक्त करण्यासाठी मोठे योगदान दिले.

चांडोळ (जि.बुलडाणा) : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रथमच घरात राहून पवित्र रमझान महिन्याचे रोजे व ईद साजरी करण्यात आली.

पवित्र रमझान महिन्यात उष्णतेच्या असह्य वेदना झेलत अल्लाहवर श्रद्धा ठेवून रविवारी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर सोमवार (ता.25) रोजी देशभरातील मुस्लिम समाजाने आपापल्या घरातच रोजे आणि ईद-उल-फित्रची नमाज स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रथमच साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. ज्यावेळी आपल्या भारत देशावर संकट आले, त्या - त्यावेळी भारतीय मुस्लिम समाजाने त्यावर मात करीत आपल्या देशाला संकटातून मुक्त करण्यासाठी मोठे योगदान दिले. आज रोजी आपल्या देशावर करोना विषाणूंच्या संकटाने आक्रमण केले असून, त्या संकटाला देशातून हद्दपार करण्यासाठी डॉक्टर्स, पोलिस प्रशासन, सफाई कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहे.

महत्त्वाची बातमी - COVID19 : कसा होतो कोरोनाच्या स्वॅबचा लॅबपर्यंत प्रवास?; कशी होते बाधित असल्याची खात्री?...वाचा

अशा कठीण समयी देशातील प्रत्येक नागरिकांनी त्यांना सहकार्य करणे काळाची गरज आहे. याच कारणाने मुस्लिम धर्मीयांचा सर्वांत मोठा असणारा ईद - उल - फित्र हा सण सर्वांनी एकदम साध्या पद्धतीने आपापल्या घरातूनच साजरा करून सहकार्य करत आदर्श निर्माण केला. तसेच कोरोना विषाणू आपल्या देशातून हद्दपार करण्यासाठी सर्व मुस्लिम बांधवांनी विशेष दुवा केली.

जुन्याच कपड्यांवर साजरी केली ईद
यंदा मुस्लिम समाजातील नागरिकांनी नवीन कपडे खरेदी न करता, त्या पैशातून गरजूंना तसेच हातावर पोट असलेल्या कुटुंबांना मदत करीत साजरी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन समाजात एक आदर्श निर्माण केला. घरातील जुनेच कपडे वापरून गरजू कुटुंबाबद्दल सामाजिक बांधिलकी जोपासली. तसेच संकट समयी दुसऱ्यास मदत करने हाच खरा मानवता धर्म असल्याचे सिद्ध केले.

ईदगाहवर कोणीच गेले नाही
ईद उल फित्रची नमाज ईदगाहवर अदा करण्यास विशेष महत्त्व आहे. परंतु कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातल्याने जमाव बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्यामुळे त्या आदेशाचे तंतोतंत पालन सर्वत्र करण्यात आले. सर्व नागरिकांनी आपल्या घरातच ईद - उल - फित्रची नमाज पठण करून साजरी केल्याने ईदगाहवर कोणीच गेले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramadan fasting and Eid were celebrated at home for the first time in buldana district