शिवसेनेचे माजी आमदार रमेश कुथे भाजपमध्ये

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

गोंदिया - शिवसेनेचे गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे व नगरसेवक राजकुमार कुथे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपमध्ये आज प्रवेश केला. भाजपचे उमेदवार हेमंत पटले यांच्या सडक अर्जुनी येथे आयोजित प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. भंडारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश पटले यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपत प्रवेश केला होता. दोनच दिवसांनंतर रमेश कुथे यांनी भाजपत प्रवेश केला. रमेश कुथे यांचे गोंदिया शहरात प्रभाव असून ते दोन वेळा शिवसेनेचे आमदार राहिले आहेत.
Web Title: ramesh kuthe entry in BJP