प्रसिद्ध चित्रकार रमेश सालोडकर यांचे अपघातात निधन

प्रसिद्ध चित्रकार रमेश सालोडकर यांचे अपघातात निधन

नागपूर ः शिवशाही बसच्या अपघातात ज्येष्ठ चित्रकार तसेच सीताबर्डीतील जोशीवाडी येथील रहिवासी रमेश सालोडकर यांचे आज अपघातात निधन झाले. ते 67 वर्षाचे होते. शनिवारी त्यांचा मृतदेह नागपूरला आणण्यात आला. रविवारी (ता.11) सकाळी दहा वाजता मोक्षधाम घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
औरंगाबाद येथील चित्रकला महाविद्यालयात एका डेमोन्स्ट्रेशनसाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्याच महाविद्यालयात त्यांची मुलगी प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. त्याकरिता सालोडकर शुक्रवारी (ता.9) रात्रीच्या बसने नागपूर येथून शिवशाही बसने रवाना झाले होते. बुलढाण्याजवळील चिखली येथील पेठा गावाजवळ शिवशाही बस उलटली. त्यात, त्यांचा मृत्यू झाला.
सिस्फा आणि बालजगतची अत्यंत जवळचा संबंध असणारे रमेश सालोडकर यांचा चित्रकला क्षेत्रात बराच मोठा गोतावळा असून, ते एक उत्कृष्ट स्केच काढणारे आणि कॅलिग्राफी करणारे चित्रकार होते. सिस्फामध्ये ते व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून कार्यरत असतानाच, बालजगतमध्ये मुलांसाठी त्यांनी विविध कार्यशाळा घेतल्या असून, त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी घडले आहेत. चंद्रकांत चन्ने, जगदीश सुकळीकर आणि रमेश सालोडकर यांची तिकडी प्रसिद्ध आहे. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच स्केच काढण्याची गोडी असणारे रमेश सालोडकर कौटुंबिक स्थितीमुळे एमएसईबीमध्ये नोकरीला होते. निवृत्त झाल्यानंतर मात्र, त्यांनी विविध चित्रकलेचे शिक्षण घेतले आणि बीएफए ला प्रवेश घेतला. यामध्ये ते प्रथम स्थानी उत्तीर्ण झाले. त्यानंतर, त्यांना देशभरात मुलांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले जात होते. त्यांच्या पश्‍चात चार मुली आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.
स्केच आर्टिस्ट आणि कॅलिग्राफी काढणारे म्हणून रमेश प्रख्यात होते. औरंबादेला निघायच्याआधी सायंकाळपर्यंत ते सिस्फामध्येच होते. सिस्फातली ती भेट अखेरचीच ठरली

- जगदीश सुकळीकर
अत्यंत मनमिळावू असा रमेश होता. त्याच्या जाण्याने चित्रकला क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे. तो कायम स्केच काढण्यात व्यस्त असे. आता, केवळ त्याच्या आठवणीच शिल्लक राहिल्या आहेत

- चंद्रकांत चन्ने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com