फोटो अपलोडची धमकी देऊन मागितली 25 हजारांची खंडणी

Ransom of Rs 25,000 demanded by threatening to upload photos
Ransom of Rs 25,000 demanded by threatening to upload photos

अमरावती : शहराच्या अर्जुननगर येथील मेडिकल कॉलनीतील युवकास फोन करून फोटो एसकॉर्ड साइडवर अपलोड करण्याची धमकी देऊन पंचवीस हजार रुपयांची खंडणी मागितली.

नीलेश मारोतराव पांडव (वय 32 ) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर ठाण्यात एका पेटीएमधारकाविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला. श्री. पांडव हे पंचकर्म उपचार घेत होते. लॉकडाऊनमुळे ते उपचार बंद झाल्यामुळे त्यांनी एका कंपनीत नोंदणी करून पाचशे रुपये पेटीएमने पाठविले.

काही वेळेतच नीलेश पांडव यांच्या मोबाईलवर व्हाइस मॅसेज आला की, तत्काळ पेटीएम द्वारे पंचवीस हजार रुपये पाठवा. अन्यथा एसकोर्ट साईडवर सर्व फोटो अपलोड करण्याची धमकी दिली.

मोबाईलवर संभाषण थांबताच, त्याच्या व्हॉटऍप क्रमांकावर त्यांचे काही फोटो आले. संबंधित पेटीएमधारकाने श्री. पांडव यांना धमकावून, पंचवीस हजार रुपयांची खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला, असा पांडव यांचा आरोप आहे. त्यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर ठाण्यात संबंधित मोबाईलधारकाविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com