11 वर्षांच्या मुलावर बलात्कार

file photo
file photo

नागपूर : नंदनवनमध्ये राहणाऱ्या 11 वर्षांच्या मुलावर दोघांनी सामूहिक बलात्कार केला. ही घटना सेंट झेवियर स्कूलसमोरील परिसरात उघडकीस आली. दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्स असलेली महिला पतीपासून विभक्‍त झाल्यानंतर मुलासह सेंट झेवियर शाळेच्या समोरील परिसरात राहते. मुलगा सहावीत शिकतो. शुक्रवारी दुपारी ती हॉस्पिटलमध्ये गेली. मुलगा घरी एकटा असताना शेजारी राहणारे दोन 17 वर्षीय मित्र घरी आले. त्यांनी मुलाला शारीरिक संबंधाची मागणी केली; मात्र त्याने नकार दिला. दोघांनी त्याला मारहाण केली आणि लैंगिक अत्याचार केला. कुणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. मात्र, घटना उघडकीस येतास आईच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विधिसंघर्षग्रस्त मुलांनी लैंगिक शोषण करताना घरातील मोबाईलमध्ये चित्रीकरण केले व फोटोही काढले. ते शूटिंग मात्र डिलिट करण्याचे विसरले. रात्री भाच्याने मोबाईल हाती घेतला. त्याला मोबाईलमध्ये शेजारचे दोन मुले लैंगिक अत्याचार करतानाचे व्हिडिओ दिसले. त्याने लगेच ही बाब उजेडात आणली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com