आठ वर्षीय मुलीवर घरमालकाच्या मुलाकडून बलात्कार 

अनिल कांबळे 
सोमवार, 21 मे 2018

नागपूर : आठ वर्षाच्या मुलीवर घरमालकाच्या 17 वर्षीय मुलाने बलात्कार केला. मुलीने पोट दुखत असल्याची तक्रार आईकडे केल्यानंतर डॉक्‍टरांकडे नेण्यात आले. त्यानंतर घडलेला प्रकार उघडकीस आला. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मुलाविरूद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. 

नागपूर : आठ वर्षाच्या मुलीवर घरमालकाच्या 17 वर्षीय मुलाने बलात्कार केला. मुलीने पोट दुखत असल्याची तक्रार आईकडे केल्यानंतर डॉक्‍टरांकडे नेण्यात आले. त्यानंतर घडलेला प्रकार उघडकीस आला. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मुलाविरूद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका जिल्ह्यातून कामाच्या शोधात नागपूरात आलेले दाम्पत्य वानाडोंगरीत एका व्यक्‍तीच्या घरी भाड्याने राहतात. तो व्यक्‍ती एका बारमध्ये वेटर आहे. या दाम्पत्याला आठ वर्षाची मुलगी आणि सहा वर्षाचा मुलगा आहे. शाळांना सुट्या असल्यामुळे दोघेही भावंड घरी राहतात तर आईवडील मोलमजुरीसाठी दिवसभर बाहेर जातात.

घरमालकाचा दहावीत शिकणारा 17 वर्षीय मुलाने 14 मे रोजी भाडेकरूच्या आठ वर्षीय मुलीशी अश्‍लिल चाळे केले. तिने प्रतिकार केला असता तिला मारहाण केली. तसेच कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. 18 मे ला दुपारी अंगणात खेळत असलेल्या मुलीला त्याने हात धरून ओढत घरात नेले. तिच्यावर बळजबरी बलात्कार केला. कुणालाही न सांगण्याची धमकी दिली. सायंकाळी कामावरून आई घरी आल्यानंतर मुलीने पोट दुखत असल्याची तक्रार केली. त्यामुळे आईने तिला डॉक्‍टरांकडे नेले. डॉक्‍टरांनी तपासल्यानंतर रक्‍तस्त्राव झाल्याचे सांगून आईला कल्पना दिली.

दवाखान्यातून दोघेही मायलेकी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोहचल्या. पोलिस निरीक्षक क्षिरसागर यांची भेट घेऊन हकीकत सांगितली. महिला पोलिसांनी आस्थेने विचारपूस केल्यानंतर अबोल आणि भेदरलेल्या मुलीने घरमालकाने बळजबरी केल्याचे सांगून अश्रूंना वाट मोकळी केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

घरमालकाच्या मुलाने भाडेकरूच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली. या प्रकरणात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयाच्या आदेशाने सुधारगृहात पाठविण्यात येणार आहे. 
- भारत क्षिरसागर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एमआयडीसी पोलिस स्टेशन, नागपूर. 

Web Title: rape on 8 years old girl by her owner s son