नंदनवन येथे महिलेवर बलात्काराचा प्रयत्न 

अनिल कांबळे
रविवार, 13 मे 2018

नागपूर : घरामागे भांडी घासत असलेल्या महिलेवर अंधाराचा फायदा घेऊन एकाने बळजबरी केल्यानंतर बलात्काराचा प्रयत्न केला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. राशिद सप्लायर (वय 40, जबलपूर, मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. 

37 वर्षीय पीडित महिला शनिवारी रात्री साडेदहा वाजता नंदनवनमधील झोपडपट्‌टीत राहणाऱ्या आजारी मैत्रिणीला भेटायला आली होती. त्यावेळी मैत्रिणीसह तिचा पती आणि पतीचा मित्र आरोपी राशिद सप्लायर हे घरी होते. चौघांनीही जेवण केले. त्यानंतर ती पीडित महिला भांडी धुण्यासाठी घरामागे गेली. तेथे अंधार होता. त्यावेळी आरोपी राशिद हा तेथे आला. त्याने अंधाराचा फायदा घेत महिलेला शारीरिक संबंधाची मागणी केली.

तिने नकार देत विरोध केला. त्यामुळे राशिदने तिच्याशी बळजबरी करीत बलात्काराचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरड केली असता राशिदने जीवे मारण्याची धमकी दिली आणि पळून गेला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: Rape attempt on woman in Nandanawan

टॅग्स