प्रियकराने केला प्रेयसीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

नागपूर : प्रॉपर्टी डिलिंगच्या एकाच कार्यालयात कामावर असताना युवतीचे पंकज राऊत (27, रा. सहकारनगर, सोनेगाव तलाव) याच्यावर प्रेम जडले. पंकजने युवतीला रूमवर नेत बलात्कार केला. तक्रारीवरून पोलिसांनी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवती निशा (बदललेले नाव) ही पूर्वी प्रॉपर्टी डीलरच्या कार्यालयात नोकरीला होती. त्याच कार्यालयात पंकजसुद्धा नोकरीवर होता. सोबत काम करीत असल्याचे त्यांच्यात मैत्री झाली. काही दिवसांत दोघांचे सूत जुळले. एक जानेवारी 2018 ला पंकजने निशाला सोनेगाव परिसरात असलेल्या रूमवर नेले व शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिल्याने पंकजने बलात्कार केला. तेव्हापासून तो बदनामी करण्याची धमकी देऊन निशाला वारंवार रूमवर नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. दोघांनीही चार महिन्यांपूर्वी प्रॉपर्टी डीलर कार्यालयातील नोकरी सोडली आणि स्वतंत्र व्यवसाय थाटला. यानंतरही पंकजने निशाला लग्न करण्याचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर पंकजने लग्नास नकार दिल्याने निशाने सोनेगाव पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rape by boyfriend