मानलेल्या काकाने केला अल्पवयीन पुतणीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

नागपूर - घरकामाच्या निमित्ताने वास्तव्यास असलेल्या १५ वर्षीय मुलीच्या असहायतेचा गैरफायदा घेत ५० वर्षीय आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना सीताबर्डी हद्दीतील उच्चभ्रू वसाहतीत उघडकीस आली. आरोपीची मुलगी आणि जावयानेही तिचा अतोनात छळ केल्याचे पुढे आले आहे. 

शैलश झा (५०) रा. पाटणा, बिहार असे अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याची मुलगी शालिनी झा (३०) आणि जावई अमित झा (३५) अशी अन्य आरोपींची नावे आहेत. शालिनी आणि अमित महाराजबाग रोड येथील पत्रकार सहनिवासमध्ये भाड्याने राहतात. पीडित मुलगी पाटणा, बिहारची असून शैलेश झा तिचा मानलेला काका आहे. अमित हा खासगी ट्यूशन क्‍लासेसमध्ये शिक्षक असून शालिनी गृहिणी असल्याने दिवसभर एकटीच घरी असते. पीडित मुलगी गरीब कुटुंबातील आहे. शैलेशने २०१७ मध्ये तिला नागपूरला आपल्या मुलीकडे पाठवून दिले. तेव्हापासून कोणत्याही चुकीसाठी झा दाम्पत्य तिचा अतोनात छळ करीत होते. काही दिवसांपूर्वी अमित आणि शालिनीला बाहेरगावी जायचे असल्याने शैलेशला बोलावून घेण्यात आले. त्याने मुलीच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. नेहमीप्रमाणेच सोमवारी रात्री मुलीला मारहाण करीत घराबाहेर काढण्यात आले. रात्री ती रस्त्यावर रडताना एका व्यक्‍तीला दिसली. त्याने सीताबर्डीचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांना कॉल करून माहिती दिली. त्यांनी मुलीला ताब्यात घेतले. तिची आपबीती अंगावर काटा आणणारी ठरली.

Web Title: Rape Crime