दोन मुलींवर अपहरण करून बलात्कार

दोन मुलींवर अपहरण करून बलात्कार

नागपूर - दोन अल्पवयीन मुलींचे दुचाकीने अपहरण करून झाडाझुडपात नेऊन चाकूच्या धाकावर बलात्कार करण्यात आल्याची घटना लकडगंज परिसरात उघडकीस आली. या प्रकरणी मुलींच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून महिला सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

लकडगंजमधील मिनिमातानगर परिसरातील सहा वर्षे व चार वर्षे वयाच्या दोन चिमुकल्या मुली २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या मोकळ्या मैदानात खेळायला गेल्या होत्या. दरम्यान, एक अज्ञात युवक तेथे आला. त्याने दोन्ही मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवले. दोन्ही मुलींना दुचाकीवरून घरी सोडून देतो असे त्यांना म्हटले. मोठ्या मुलीने नकार दिला तर लहान मुलगी दुचाकीवर बसली. थोडे दूर गेल्यानंतर तो पुन्हा परत आला. त्याने मोठ्या मुलीलाही बळजबरीने दुचाकीवर बसवले. दोघींनाही मिनिमाता रेल्वेलाइन जवळच्या हल्दीराम फॅक्‍टरीच्या पाठीमागील झाडाझुडपात नेले. तेथे चाकूच्या धाकावर दोघींसोबतही लैंगिक अत्याचार केला. दोन्ही मुलींना तेथेच सोडून आरोपी पळून गेला. रात्रीचे साडेआठ वाजता त्या दोघीही अंधारात घराची वाट शोधत पायी जात होत्या. त्या अंधारात हातात कपडे घेऊन फिरत असल्याचे बाजूच्या कारखान्यातील मजुरांच्या लक्षात आले. मुलींवर अतिप्रसंग झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांना या मुलींना घराचा पत्ता विचारून घरी नेऊन दिले व त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात दिले. यानंतर याची लकडगंज पोलिसांना माहिती देण्यात आली.

रक्‍ताने माखले कपडे
दोन्ही मुली एकमेकांच्या शेजारी राहतात. दोघीही मैदानावर खेळत होत्या. नराधम युवकाने दोघींवर पाशवी बलात्कार केला. दोघींनीही आरडाओरड केली. मात्र, सुनसान परिसर असल्यामुळे कुणीही मदतीस धावून आले नाही. दोन्ही मुलींचे कपडे रक्‍ताने माखलेले होते. त्यावरून मदतीस आलेल्या मजुरांना प्रकार लक्षात आला.

आरोपी ओळखीचा?
आरोपी वस्तीतीलच असावा, जेणेकरून मोठी मुलगी त्याला चेहऱ्याने ओळखत असावी. त्यामुळेच दोन्ही मुली सोबत जाण्यास तयार झाल्या. त्यामुळे पोलिसांनी वस्तीतील काही संशयितांची ताब्यात घेऊन प्राथमिक चौकशी केली आहे. पोलिसांनी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले असून आरोपींचा कसून तपास सुरू आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com