अल्पवयीन मुलींवर शेजाऱ्याचा अत्याचार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

बाळापूर (ता. नागभीड) - पहिल्या आणि तिसऱ्या वर्गातील चिमुकल्या मुलींवर एका पंचावन्न वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना बाळापूर (ता. नागभीड) येथे घडली. आरोपी तिलकचंद अग्निकर याला पोलिसांनी अटक केली आहे. 

बाळापूर (ता. नागभीड) - पहिल्या आणि तिसऱ्या वर्गातील चिमुकल्या मुलींवर एका पंचावन्न वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना बाळापूर (ता. नागभीड) येथे घडली. आरोपी तिलकचंद अग्निकर याला पोलिसांनी अटक केली आहे. 

पीडित मुलींचे आईवडील मजुरी करतात. दोन्ही मुलींच्या आई मंगळवारी (ता. 10) सकाळी सात वाजताच कामावर गेल्या होत्या. त्या घराशेजारीच राहतात. त्यांच्या दोन्ही मुली मैत्रिणी आहेत. आई-वडील कामावरून परत येईपर्यंत त्या एकत्र खेळत असतात. दोघींचेही आई-वडील दुपारी मजुरीवरून परत आले तेव्हा त्यांना मुली दिसल्या नाहीत. नेहमीप्रमाणे खेळत असतील म्हणून त्यांनीही दुर्लक्ष केले. मात्र मुली सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घरी परतल्यावर त्यांनी घडलेला प्रकार आईला सांगितला, तेव्हा त्यांना धक्का बसला. तिलकचंद अग्निकर याचे नेहमीच या मुलींच्या घराकडे येणे-जाणे असते. त्यामुळे त्याला दोन्ही मुली ओळखत होत्या. याच ओळखीचा फायदा घेत त्याने मुलींवर अत्याचार केला. मुली खेळत असताना त्याने फ्रूटी घेण्यासाठी दोघींनाही दहा-दहा रुपये दिले. त्यानंतर खेळत असताना तिलकचंदने त्या मुलींना नवीन बांधकाम सुरू असलेल्या शौचालयात बोलविले. त्यांना आणखी दहा-दहा रुपये देऊन दोघींवर अत्याचार केला. हा प्रकार समजल्यानंतर काल (ता. 11) अत्याचारग्रस्त मुलींच्या पालकांनी रामनगर पोलिसांत तक्रार केली. चौकशीनंतर पोलिसांनी अग्नीकर याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. 

Web Title: rape on minor girls

टॅग्स