सासऱ्याकडून सुनेवर दोन वर्षांपासून बलात्कार

मंगळवार, 15 मे 2018

लग्नाच्या काही दिवसांनी तो तिच्यावर अत्याचार करू लागला. याची तक्रारही तिने सासूकडे केली. मात्र, सासूही त्या अत्याचाराचे समर्थन करू लागली. पीडित महिलेला कुणाला भेटू देण्यात येत नव्हते. तिचा कुणाशी संपर्क येऊ नये, याची काळजी घेण्यात येत होती. या दोन वर्षांत ती तीनदा गर्भवती राहिली. दोनदा तिच्या सासू व सासऱ्यानी गर्भपात करवला.

नागपूर : मुलगा मतिमंद असतानाही त्याचा एका तरुणीशी विवाह करून दिला आणि सासऱ्याने सुनेवर सतत दोन वर्षे बलात्कार केला. या काळात ती महिला तीनदा गर्भवती राहिली व तिसºया वेळेला तिची प्रकृती खालावल्याने ही धक्कादायक घटनाावीन कामठी पोलीस ठाण्यांतर्गत समोर आली.
राजदत्त ऊर्फ राजू (५२) असे आरोपीचे नाव आहे.१ मे २०१६ ला पीडित २३ वर्षीय महिलेचा विवाह आरोपीच्या मुलाशी झाला. त्यानंतर ती सासरी राहू लागली. मात्र, तिचा पती मतिमंद असल्याचे लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून तिला समजले. यासंदर्भात तिने सासूकडे तक्रार केली. तिने आपल्या आईवडिलांनाही माहिती दिली. मात्र, आईवडील गरीब असून तिच्या सासऱ्यानी मुलीला काहीही कमी पडणार नाही, असे सांगून संसार करायला भाग पाडले. लग्नाच्या काही दिवसांनी तो तिच्यावर अत्याचार करू लागला. याची तक्रारही तिने सासूकडे केली. मात्र, सासूही त्या अत्याचाराचे समर्थन करू लागली. पीडित महिलेला कुणाला भेटू देण्यात येत नव्हते. तिचा कुणाशी संपर्क येऊ नये, याची काळजी घेण्यात येत होती. या दोन वर्षांत ती तीनदा गर्भवती राहिली. दोनदा तिच्या सासू व सासऱ्यानी गर्भपात करवला. तर तिसऱ्यादा गर्भवती असता १ मे २०१८ ला तिला आपोआप गर्भपात झाला. तिची प्रकृती खालावली व तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती खालावली असल्याने तिची मामी तिला भेटायला रुग्णालयात गेली. त्यावेळी तिने आपल्यावर दोन वर्षांपासून अत्याचार होत असल्याची माहिती दिली. तिच्या मामीने तिची सुटका केली व तिला आईवडीलांच्या घरी नेले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सोनाली मेश्राम यांनी गुन्हा दाखल करून आरोपी राजू याला अटक केली. तर सासूचा गुन्हयातील सहभाग तपासण्यात येत असल्याचे ढेरे यांनी सांगितले.

Web Title: Rape News