गर्भवती प्रेयसीवरच केला बलात्कार

अनिल कांबळे
शनिवार, 30 जून 2018

पीडित 20 वर्षीय युवती रूपाली (बदललेले नाव) ही गंगानगरमध्ये राहते. आईवडील मजुरी करतात तर तिला दोन बहिणी आहेत. रूपाली बी.ए. प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे. जानेवारी 2018 मध्ये आरोपी बंटी धोटे हा रूपालीच्या मानलेल्या भावासह घरी आला. त्यावेळी रूपालीशी त्याची ओळख झाली. त्यानंतर त्याने रूपालीच्या घरी येणे सुरू केले. त्याने तिच्या आजीकडून तिचा मोबाईल क्रमांक घेतला.

नागपूर - चार महिन्यांची गर्भवती असलेल्या प्रेयसीवर युवकाने बलात्कार केला. या प्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. बंटी उर्फ रविंद्र विजय धोटे (वय 25, रा. हजारी पहाट) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली. 

पीडित 20 वर्षीय युवती रूपाली (बदललेले नाव) ही गंगानगरमध्ये राहते. आईवडील मजुरी करतात तर तिला दोन बहिणी आहेत. रूपाली बी.ए. प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे. जानेवारी 2018 मध्ये आरोपी बंटी धोटे हा रूपालीच्या मानलेल्या भावासह घरी आला. त्यावेळी रूपालीशी त्याची ओळख झाली. त्यानंतर त्याने रूपालीच्या घरी येणे सुरू केले. त्याने तिच्या आजीकडून तिचा मोबाईल क्रमांक घेतला.

कॉलेजला जाताना तिचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर त्याने रूपालीशी मैत्री केली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गेल्या चार महिन्यांपासून तिच्यावर बलात्कार करीत होता. तिने गर्भवती असल्याचे सांगितल्यानंतरही तिचे तो लैंगिक शोषण करीत होता. त्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. 
 
आईवडीलाचा मुलीला ठेवण्यास नकार 
ती महिन्यांची गर्भवती झालेल्या रूपालीने लग्नाचा तगादा लावला. त्याने लग्नास नकार देऊन बदनामी करण्याची धमकी देत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती गर्भवती झाल्यामुळे तिच्या आईवडीलाने बदनामीच्या भीतीपोटी घरात ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे रूपालीच्या समोर कुठे राहावे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

Web Title: Rape on a pregnant girlfriend