नऊ महिन्यांच्या गर्भवतीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

नागपूर - नऊ महिन्यांच्या गर्भवती असलेल्या महिलेवर शेजारी राहणाऱ्या युवकाने बलात्कार केला. पतीने विरोध केला असता त्याच्यावर हल्ला केला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.

नागपूर - नऊ महिन्यांच्या गर्भवती असलेल्या महिलेवर शेजारी राहणाऱ्या युवकाने बलात्कार केला. पतीने विरोध केला असता त्याच्यावर हल्ला केला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.

पीडित 20 वर्षीय महिला सोनाक्षी (बदललेले नाव) ही सोनेगावातील भेंडे ले-आउटमध्ये पतीसह राहतात. गेल्या दोन वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले असून, पती पेंटिंगची काम करतो. आरोपी छोटू ऊर्फ मद्रासी मेश्राम (वय 40, रा. भेंडे ले-आउट) हा सोनाक्षीच्या वस्तीत राहतो. त्याचे सोनाक्षीच्या घराशेजारी राहणाऱ्या आरोपी मीराबाई हिच्या घरी येणे-जाणे होते. दरम्यान, त्याची सोनाक्षीच्या पतीसोबत ओळख झाली. या दरम्यान त्यांची मैत्री झाली.

त्यामुळे दोघांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. मद्रासीने सोनाक्षीशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, ती नकार देत होती. शनिवारी दुपारी अडीच वाजता मद्रासी हा आरोपी मीराबाई हिच्या घरी आला. त्याने मीराबाईला 1000 रुपये देण्याचे आमिष दाखवून सोनाक्षीला घरी बोलविण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने सोनाक्षीला घरी बोलावले. मद्रासी आणि सोनाक्षीसाठी तिने चहा केला आणि बाथरूमला जाऊन येते, असे म्हणून ती घराबाहेर निघून गेली. तिने घराला बाहेरून कडी लावली आणि ओट्यावर बसली. दरम्यान, आरोपीने सोनाक्षीला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच याने बळजबरी करीत तिच्यावर बलात्कार केला. तिचा किंचाळण्याचा आवाज ऐकून तिचा पती तेथे आला. त्याने पत्नी कुठे आहे, असे विचारत मीराबाईला दार उघडण्यास सांगितले. मात्र, तिने दार उघडण्यास नकार देत वाद घातला. दरम्यान, मद्रासीने दार उघडले. मीराबाई आणि मद्रासी या दोघांनी सोनाक्षीच्या पतीला जबर मारहाण केली. त्याने पत्नीला घेऊन सोनेगाव पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून मद्रासी मेश्रामला अटक केली.

Web Title: rape on pregnant lady news