शेगावमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार; तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मे 2019

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २४ मे रोजी एका महिलेला तिघांनी मंदिर परिसरातून ज्युस पाजण्याच्या बहाण्याने चारमोरी पुलाकडे नेले आणि त्या भागात सामूहिक बलात्कार करून मारहाण केली. तसेच कुणाकडे वाच्यता केल्यास जीवाने ठार मारण्याची धमकी दिली. पोलीसांनी आधी अज्ञात आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला.

शेगाव : शहरातील चारमोरी पुलाजवळ राजस्थानमधील महिलेवर सामूहिक बलात्कार प्रकरणी २५ जूनच्या उशिरा रात्री पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २४ मे रोजी एका महिलेला तिघांनी मंदिर परिसरातून ज्युस पाजण्याच्या बहाण्याने चारमोरी पुलाकडे नेले आणि त्या भागात सामूहिक बलात्कार करून मारहाण केली. तसेच कुणाकडे वाच्यता केल्यास जीवाने ठार मारण्याची धमकी दिली. पोलीसांनी आधी अज्ञात आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला.

तपासात आरोपींची नावे निष्पन्न झाल्यावर शनिवारी रात्री त्यांना अटक करण्यात आली.शंकर हाडे, सचिन बढे, निलेश घुले राहणार शेगाव अशी आरोपींची नावे आहेत तपास शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील हूड, एपीआय सचिन चव्हाण, पोलीस कर्मचारी उमेश बोरसे, महेंद्र नारखेडे करीत आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rape on women in shegaon three arrested