भाग्यच की! ताडोबा नॅशनल पार्कमध्ये दिसला दुर्मिळ काळा बिबट्या

Rare black leopard seen in Tadoba National Park
Rare black leopard seen in Tadoba National Park

नागपूर : विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या ताडोबा नॅशनल पार्कमध्ये वाघांची मोठी संख्या आहे. तसेच अन्य प्राणीही मोठ्या प्रमाणात आढळून येतात. येथील वाघांना बघण्यासाठी दूरवरून पर्यटक येत असतात. देश-विदेशातील पर्यटकांनाही येथील वाघांनी भुरळ घातली आहे. आता ताडोबामध्ये दुर्मिळ काळा बिबट्या दिसल्याचे वन्यजीव छायाचित्रकार अनुराग गावंडे याने म्हटले आहे. तसेच फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.

मागच्या वर्षीही काळ्या रंगाच्या बिबट्याचा फोटो अनुराग गावंडे याने सोशल मीडियात टाकला होता. काही वेळातच हा फोटो चांगलाच प्रसिद्ध झाला होता. आता नवीन वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात काळ्या रंगाचा बिबट्या पुन्हा त्याला दिसला. एका क्षणाचाही विलंब न करता अनुरागने काळ्या बिबट्याचे फोटो कॅमेऱ्यात कैद केला. तसेच त्याचे फोटोसुद्धा त्याने सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.

काळ्या रंगाचा बिबट फार दिसत नाही. तो अत्यंत दुर्मिळ प्राणी आहे. हा बिबट दिसणे म्हणजे भाग्यच समजा लागेल. कारण, या बिबट्याबद्दल नागरिकांना सोडा अनेक पर्यटकांना माहिती नाही. कोणी काळ्या रंगाचा बिबट असू शकतो यावर विश्वासही करणार नाही. सर्वजण त्याचा शोध फक्त इंटरनेटवर घेत असतात. जगभरात किती काळ्या रंगाचे बिबटे आहेत याची अधिकृत माहितीसुद्धा कोणाला नाही. त्यामुळे हा बिबट दिसणे म्हणजे भाग्यच म्हणाव लागेल.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anurag Gawande (@anurag10ag)

बिबट्या ओलांडत होता ट्रॅक

वन्यजीव छायाचित्रकार अनुराग गावंडे याने महाराष्ट्रातील ताडोबा नॅशनल पार्कमध्ये दुर्मिळ काळा बिबट दिसल्यानंतर छायाचित्र आणि व्हिडिओ सोशल मीडियाव टाकले. यात बिबट्या ट्रॅक ओलांडत असल्याचे दिसून येत आहे. बिबट दिसल्यानंतर आम्ही आमचे वाहन बंद ठेवले आणि पुरेसे अंतर ठेवले होते. त्यामुळेच तो घटनास्थळावरून हलला नाही आणि फोटो काढणे शक्य झाल्याचे अनुराग गावंडे याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com