esakal | पोहरा जंगलातील या दुर्मिळ प्राण्याला भरधाव वाहनाने उडविले.... 
sakal

बोलून बातमी शोधा

Indian small Siwet cat

मसन्या उदच्या कुळातील हा एक दुर्मिळ प्राणी आहे. या कुळातील काही प्राणी हे आययूसीएन लाल यादी श्रेणीमध्ये म्हणजे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे हेल्प फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष रत्नदीप वानखडे यांनी सांगितले.

पोहरा जंगलातील या दुर्मिळ प्राण्याला भरधाव वाहनाने उडविले.... 

sakal_logo
By
राजेश तंतरपाळे

अमरावती ः कोरोनामुळे लागलेल्या लॉगडाउनमुळे वाहतूक कमी झाली. त्यामुळे अनेक दुर्मिळ प्राणी, पक्षी दिसायला लागले. अशातच रविवारी रात्री पोहरा-चिरोडी जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर दुर्मिळ समजला जाणारा इंडियन स्मॉल सिवेट कॅट मृतावस्थेत आढळून आला. भरधाव वेगाने जाणाऱ्या कोण्यातरी अज्ञात वाहनाने त्याला उडविले असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

हेही वाचा - घरातील कुटूंब साखरझोपेत असतानाच अचानक आभाळ कोसळले अन्… वाचा पुढे 

मसन्या उदच्या कुळातील हा एक दुर्मिळ प्राणी आहे. या कुळातील काही प्राणी हे आययूसीएन लाल यादी श्रेणीमध्ये म्हणजे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे हेल्प फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष रत्नदीप वानखडे यांनी सांगितले. भारतीय छोटा उदमांजर हा प्राणी मांसाहारी असून उंदीर, सरडे, बेडूक, पक्षी व त्यांची अंडी, साप हे या प्राण्याचे मुख्य खाद्य आहे. हा उदमांजर रात्रीच निघत असल्याने सहसा दिसून येत नाही. 

असे का घडले? - पती, मुलांना श्रद्धांजली वाहून ‘तिने’ संपवले जीवन, वाचा नेमके काय झाले
 

दिवसभरात तो जमिनीतील खड्ड्यांमधील कपारीत किंवा झाडांवर आराम करतो. पोहरा जंगलात या प्राण्याचे अस्तित्व दिसून आले आहे. परंतु भरधाव वेगाने चालणारी वाहने पोहरा जंगलातील दुर्मिळ प्राण्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. पोहरा जंगलाच्या रस्त्यावर वनविभागाने मार्गदर्शक पाट्या लावाव्या, असे आवाहन संस्थेचे सदस्य आतिश भिमके, धीरज निरगुडे, गौरव वानखडे, अनिकेत मनोहरे आदींनी केली आहे. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर 
 

loading image
go to top