esakal | राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेला ६८ वर्षे पूर्ण, आषाढी एकादशीला मिळाली लिखाणाची स्फूर्ती
sakal

बोलून बातमी शोधा

rashtrasant

राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेला ६८ वर्षे पूर्ण, आजच्या दिवशी मिळाली होती स्फूर्ती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : मानवी जीवनाची एक आदर्श आचारसंहिता म्हणजेच राष्ट्रसंतांचा ग्रामगीता ग्रंथ (rashtrasant tukadoji maharaj gramgeeta). ग्रामगीतेलाच आजच्या काळाची संजीवनी बुटीसुद्धा संबोधण्यात येते. विशेष म्हणजे, मंगळवारी (ता. २०) आषाढी एकादशीच्या (ashadhi ekadashi 2021) शुभदिनी ग्रामगीतेला ६८ वर्षे पूर्ण होत आहेत. २२ जुलै १९५३ रोजी आषाढी एकादशीला वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना पुण्यक्षेत्र पंढरपूर येथे चंद्रभागेच्या तीरी ब्रह्म मुहूर्तावर ग्रामगीता लिखाणाची स्फूर्ती मिळाली. आषाढी एकादशीला ग्रामगीता ग्रंथ ६९ वर्षात पदार्पण करीत आहे. (rashtrasant tukadoji maharaj gramgeeta completes 68 years)

हेही वाचा: यवतमाळ : कळंबच्या कन्येला विठ्ठल पूजेत सहभागी होण्याचा मान

यासंदर्भात गुरुकुंज मोझरीचे माजी सेवाधिकारी गजानन जिकार यांनी सांगितले की, ग्रामगीता हा ग्रंथ मानवी जीवनात खरी उभारी देऊन मनुष्याला आदर्श नागरिक घडविण्याची गुरुकिल्ली आहे. हा ग्रंथ स्वतंत्र भारताचे दुसरे संविधान असल्याची कबुली थोर महात्मे तसेच ग्रामविकासावर कार्य करणाऱ्या मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पुण्यक्षेत्र पंढरपूरच्या वाळवंटात ब्रह्म मुहूर्तावर ध्यानात बसले असताना अद्भुत दृष्टांत झाला. देशातील जनतेला कर्मकांड व पोथीपुराणामध्ये अडकून न ठेवता त्यांना दैनंदिन जीवन कसे जगावे. सद्सद्विवेकबुद्धीत विश्वव्यापक दर्शन माहिती ग्रामगीता ग्रंथात समाविष्ट केली असून राजकारणी व इतर लोकांनी कसे वागावे, काय करावे, याची सूत्रबद्ध दिशादर्शक आचारसंहिता लोकभल्यासाठी अनुभवत आहेत. याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामस्वच्छता, स्त्री-पुरुष समानता, कुटुंब कल्याण, महिला सक्षमीकरण, आदर्श गाव विकास, बेटी बचाव-बेटी पढाव, युवक संघटन, खेड्याकडे चला आदी महामंत्र पुण्यक्षेत्र पंढरपूरच्या या पावन पर्वावर १९५३ ला ग्रामगीता युगग्रंथात महाराजांनी समाविष्ट करून घेतले.

ग्रामगीता युगग्रंथात एकूण ४१ अध्याय असून चार हजार ६७४ ओव्या आहेत. पाच अध्याय मिळून एक पंचक आहे. ग्रामगीता युगग्रंथ आता अभ्यासाचा विषय झाला आहे. विशेष म्हणजे देशातील अनेक विद्यापीठांमधील अभ्यासक्रमात ग्रामगीतेचा समावेश झाला आहे. राष्ट्रसंतांच्या सहवासात रामकृष्णदादा बेलूरकर सेवेसाठी असायचे. रामकृष्ण दादांना ग्रामगीता वाचण्याचे, प्रचार व प्रसार करण्याचे भाग्य लाभले. राष्ट्रसंतांनी रामकृष्णदादांना ग्रामगीताचार्य ही पदवी बहाल केली. आज हजारो विद्यार्थी या ग्रंथावर अभ्यास करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

loading image