esakal | राष्ट्रसंतांचा पुण्यतिथी महोत्सव ऑनलाइन; गर्दी न करण्याचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रसंतांचा पुण्यतिथी महोत्सव ऑनलाइन; गर्दी न करण्याचे आवाहन

राष्ट्रसंतांचा पुण्यतिथी महोत्सव ऑनलाइन; गर्दी न करण्याचे आवाहन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मोझरी (जि. अमरावती) : लाखो गुरुदेवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गुरुकुंज मोझरी येथे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव यंदा सुद्धा ऑनलाइन पद्धतीने साजरा होणार आहे.

हेही वाचा: ZP Election : भाजपची स्पेस वाढतेय, शिवसेनेची अधिक घसरण - फडणवीस

दरवर्षी हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. परंतु कोरोनामुळे यावर्षी महाराजांचा 53 वा पुण्यतिथी महोत्सव तिथीनुसार 25 ऑक्टोंबर रोजी साध्या पद्धतीने ऑनलाइन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाकडून आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आली.

विशेष म्हणजे सर्वत्र आरोग्याची बिकट परिस्थिती पाहता यावेळी पहिल्यांदाच पुण्यतिथी महोत्सवानिमित्त संपूर्ण राज्यात जिल्हा स्तरावर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच पंचक्रोशीतील गुरुदेव भक्तांनी 25 ऑक्टोंबर रोजी होऊ घातलेला मौन श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण श्री गुरुदेव टि. व्ही. या युट्यूब चॅनेलवर पाहण्याचे आवाहन श्री गुरुदेव सेवा मंडळाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: IPL 2021, RCB vs SRH : हैदराबादचा सलामीचा प्रयोग अपयशी

यावेळी पत्रकार परिषदेला अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, उपसर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, प्रचार प्रमुख दामोधर पाटील, ग्रामगीता विभाग प्रमुख गुलाबराव खवसे, डॉ. राजाराम बोथे आदी उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देशसेवेला नेहमीच प्राथमिकता दिली आहे. तेव्हा देशहितासाठी पुण्यतिथी महोत्सव साजरा न करणे हेसुद्धा महाराजांच्या विचारांना अनुसरूनच आहे. तसेच लाखो गुरुदेव भक्तांच्या हृदयात महाराजांचे स्थान अटळ आहे, असे मंजुळा माता भजन मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई उमप यांनी सांगितले.

नियमांचे पालन करणे हीच खरी श्रद्धांजली

अनलॉकचा आदेश आला असला तरी शासनाची नियमावली कायम आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील गुरुदेव भक्तांनी गर्दी न करता आपापल्या ठिकाणावरूनच नतमस्तक होऊन श्रद्धांजली अर्पण करावी. असे आवाहन श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ यांनी केले आहे.

loading image
go to top