भाजप-सेनेच्या खेळीत 'राकॉं'चा गेम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

यवतमाळ : जिल्हा परिषदेतील दोन सभापतींवर अविश्‍वास पारित झाल्यानंतर शुक्रवारी (ता. 21) सभापती निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यात भाजप-शिवसेनेने खेळी करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा "गेम' केला असून, दोन्ही सभापतिपदे शिवसेनेकडे गेले. जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती नीमिष मानकर आणि शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे यांच्याविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव पारित झाला. त्यामुळे या दोन पदांकरिता उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. 21) सभा बोलाविण्यात आली होती. यादरम्यान सभापतिपदासाठी केवळ शिवसेनेने अर्जाची उचल केली.

यवतमाळ : जिल्हा परिषदेतील दोन सभापतींवर अविश्‍वास पारित झाल्यानंतर शुक्रवारी (ता. 21) सभापती निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यात भाजप-शिवसेनेने खेळी करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा "गेम' केला असून, दोन्ही सभापतिपदे शिवसेनेकडे गेले. जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती नीमिष मानकर आणि शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे यांच्याविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव पारित झाला. त्यामुळे या दोन पदांकरिता उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. 21) सभा बोलाविण्यात आली होती. यादरम्यान सभापतिपदासाठी केवळ शिवसेनेने अर्जाची उचल केली. यामध्ये कालिंदा पवार व गजानन बेजंकीवार यांचा समावेश होता. त्यानंतर दुपारी दोन वाजता उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात झाली. कालिंदा पवार यांना सूचक म्हणून शिवसेनेचे गटनेते श्रीधर मोहोड, तर गजानन बेजंकीवार यांना सूचक पावनी कल्यमवार होत्या. शिवसेनेच्या दोन सदस्यांनी अर्जाची उचल केल्याने सभापतिपदासाठी बिनविरोध निवड झाल्याचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी जाहीर केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी बांधकाम सभापती नीमिष मानकर यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव पारित करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच दहा सदस्यांनी मदत केली होती. त्यावेळी त्यांना सभापतिपद देऊ, असा शब्द दिला होता. मात्र, भाजप व शिवसेनेने वेळेवर खेळलेल्या खेळीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला सभापतिपद नाकारण्यात आले. या खेळीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच गेम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rashtrawadi - bjp-sena