esakal | Video : 45 अंश सेल्सिअसमध्ये शेतकरी उतरले रस्त्यावर; कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

Rasta Roko agitation of farmers for buying cotton

जिनिंगद्वारे दलाल शेतकऱ्यांना आम्ही तुमचा कापूस तात्काळ विकून देऊ अशी हमी देत कमी भावात त्यांचा कापूस खरेदी करून जास्त भावात विकण्याच्या गोरखधंदा सुद्धा सुरू आहे, यावर सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

Video : 45 अंश सेल्सिअसमध्ये शेतकरी उतरले रस्त्यावर; कारण...

sakal_logo
By
दीपक खेकारे

गडचांदूर (जि. चंद्रपूर) : सीसीआयद्वारा शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जात नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी चंद्रपूर आदिलाबाद महामार्ग रोखून धरत चक्काजाम आंदोलन केले. तात्काळ कापूस खरेदी करावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. 45 अंश सेल्सिअसमध्ये शेतकरी रस्त्यांवर उतरून आंदोलन करीत होते. 

पुढील हंगामाचे दिवस समोर आले आहे. पेरणी करण्यासाठी बी-बियाणे खरेदी करायची आहे. मात्र, बऱ्याच शेतकऱ्यांचा आजही पूर्ण कापूस घरातच आहे. सीसीआयच्या ऑनलाइन नोंदणी क्रमांक प्रमाणे प्रतीक्षा केल्यानंतरसुद्धा शेतकऱ्यांचा नंबर येत नाही. यामुळे गरजू शेतकरी संतप्त होऊन खासगी व्यापाऱ्यांना कमी भावात कापूस विकत आहेत. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी गडचांदूर चंद्रपूर आदीलाबाद मार्ग रोखून धरला. यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होण्याची श्‍यक्‍यता आहे.

क्लिक करा - आंबटशौकिनांच्या मागणीत प्रचंड वाढ... बंद ब्यूटी पार्लर, ढाब्यांमध्ये रंगतोय खेळ

सध्या सीसीआय माध्यमातून गाड्यांचा नंबर सुद्धा लागत नाही. कारण, बाजार समितीद्वारे 15 दिवस आधिपासून ऑनलाइन नंबर लावण्याच्या सूचना शेतकऱ्यांना दिल्या आहेत. पंधरा दिवस आधिपासून नंबर लावल्यानंतरही कुणाचाच नंबर लागलेला नाही.

द्वारे शेतकऱ्यांचे फसवणुकीचे प्रमाण वाढत आहेत. जिनिंगद्वारे दलाल शेतकऱ्यांना आम्ही तुमचा कापूस तात्काळ विकून देऊ अशी हमी देत कमी भावात त्यांचा कापूस खरेदी करून जास्त भावात विकण्याच्या गोरखधंदा सुद्धा सुरू आहे, यावर सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

उन्हाची सोय आहे परंतु प्यायला पाणी नाही

कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कालपासून शेतकऱ्यांच्या कापसाच्या गाड्या उभ्या आहेत. परंतु, अजूनही कुणाचा नंबर लागलेला नाही. शेतकऱ्यांच्या डोक्‍यावर कर्जाचा डोंगर उभा होत आहे. पुढे काय करायचं याचा प्रश्न उभा आहे. भर उन्हात शेतकरी बाजार समिती परिसरात आहेत. उन्हाची सोय आहे परंतु प्यायला पाणी नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.

अधिक माहितीसाठी - Video : शिवसैनिकांच्या संयमाचा बांध फुटला; मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांसोबत केलं असं

चार हजारात सीसीआयला गाडी

सामान्य शेतकरी वर्ग नोंदणी करून सुद्धा गाड्या लागत नाही. परंतु, काही दलाल लोकांनी चार हजार घेऊन आपल्या गाड्याचे नंबर समोर लावले आहेत.