करचखेडा येथे `स्वाभिमानी`चा रास्ता रोको

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

भंडारा : स्वाभिमानी शेतकरी संघटना भंडारा यांच्या वतीने भिलेवाडा फाटा ते मांडवी रस्त्याचे दोन वर्षांपासून बंद असलेले काम सुरू केले नाही. याचा निषेध करण्यासाठी रविवारी (ता. 15) करचखेडा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

भंडारा : स्वाभिमानी शेतकरी संघटना भंडारा यांच्या वतीने भिलेवाडा फाटा ते मांडवी रस्त्याचे दोन वर्षांपासून बंद असलेले काम सुरू केले नाही. याचा निषेध करण्यासाठी रविवारी (ता. 15) करचखेडा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी तालुक्‍यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभागी होऊन वाहतूक अडवून ठेवली. दोन वर्षांपासून बंद असलेले भिलेवाडा-करचखेडा-खमारी-मांडवी रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे. रस्त्यावरून ये-जा करताना अपघात होऊन कायमचे अपंगत्व आलेल्या नागरिकांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अपघात होऊन मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबासह 10 लाख रुपये भरपाई देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी पोलिस बंदोबस्तात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली. यापैकी काही मागण्या मान्य करत असल्याचे आश्‍वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुनील कुबडे व विष्णू ओडपल्लीवार यांनी दिले. येत्या 7 दिवसांत काम रस्त्याचे बांधकाम पूर्ण करून देण्याचे लेखी आश्वासन स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आले. त्यानंतर रास्ता रोको आंदोलनाची सांगता करण्यात आली.
या रस्त्याचे काम 7 दिवसांत पूर्ण केले नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाप्रमुख प्रभाकर सार्वे यांनी दिला आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rasta roko of Swabhimani at Karakheda