राष्ट्रसंत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सदानंद मोरे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

अकोला - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व संत साहित्यिक प्रा. डॉ. सदानंद मोरे हे अकोला येथे 27 व 28 जानेवारी रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहतील. 

राष्ट्रसंतांच्या समग्र साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या हेतूने अकोला येथे गेल्या चार वर्षांपासून साहित्य संमेलनाचे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी सेवा समिती अकोला यांच्या वतीने करण्यात येत आहे. यापूर्वी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले आचार्य वेरुळकर गुरुजी, डॉ. भास्करराव विघे गुरुजी मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ मोझरीच्या तत्त्वप्रणालीनुसार संमेलन होणार असून, शेकडो पुस्तकांचा प्रचार साहित्य संमेलनाच्या माध्यमातून देशभरात व्हावा हादेखील यामागचा मुख्य उद्देश आहे. 

Web Title: Rastrasant sahitya sammelan president Sadanand More