'गॅस एजन्सीसाठी रेशन दुकानांना प्राधान्य'

Girish-Bapat
Girish-Bapat

शेगाव - 'स्वस्त धान्य दुकानदारांच्या अडचणी व समस्या सोडविण्याबाबत शासन सकारात्मक विचार करीत आहे. कमिशन वाढीबाबत केंद्र सरकारला दोन वेळा पत्राद्वारे विनंती करण्यात आली. आता स्वस्त दुकानदारांना जास्तीचा व्यवसाय मिळावा, यासाठी पांढरे रॉकेल, उज्ज्वला गॅस, तसेच खासगी गॅस एजन्सी देण्याबाबत प्राधान्य देण्यात यावे,'' अशी विनंती गॅस कंपन्यांना करण्यात येणार असल्याची माहिती अन्नपुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी दिली.

स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक आज मुंबईत झाली. या बैठकीत बहिष्कार मागे घेण्याचे आवाहन बापट यांनी केले. देशभरातील दुकानदारांना एकच कमिशन देण्यात यावे, दुकानदारांना मानधन किंवा वेतन निश्‍चित करावे यांसह विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्र रास्त भाव दुकानदार व केरोसिन डिलर महासंघाने मार्च महिन्यापासून बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. त्यावर बापट यांनी राज्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com