रवींद्र ठाकरे नवे जिल्हाधिकारी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

नागपूर : जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांना जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अधिसूचना निघाल्यानंतर मुद्‌गल यांची बदली करण्यात आल्याने प्रशासनात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. भंडाऱ्याच्या जिल्हाधिकारी पदावर नाशिकचे विभागीय आयुक्त एम. जे. प्रदीपचंद्रन यांची नियुक्ती करण्यात आली.

जिल्हाधिकारी यांची बदली झाल्याची चर्चा आज सकाळपासून होती. सायंकाळी साडेचार-पाचच्या सुमारास हे आदेश कार्यालयात धडकले. अतिरिक्त विभागीय आयुक्तपदावर बदली करण्यात आली. अतिरिक्त विभागीय आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार नरेगाचे आयुक्त ए. एस.आर. रंगा नायक यांच्याकडे होता. ही जागा रिक्त असल्याने मुद्‌गल यांची बदली रिक्त जागेवर करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कॉंग्रेसचे माजी लोकसभा उमेदवार नाना पटोले यांनी त्यांच्यावर 50तक्रारी केल्या होत्या. त्यांच्या तक्रारीचा भाग वगळता निवडणुकीत मुद्‌गल यांचे काम उत्तम असल्याचे सांगण्यात येते. अनेक नवीन उपक्रम त्यांनी राबविले. असे असतानाही अर्ज स्वीकारण्याची अधिसूचना निघाल्यानंतर बदली केल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येते. विशेष म्हणजे निवडणुकीकरता मुद्‌गल यांनी उत्तम कामगिरी बजावली. त्यांच्या प्रयत्नामुळेच मतदार नोंदणीचा टक्का वाढला.
जिल्हाधिकारी पद केले अवनत
रवींद्र ठाकरे महाराष्ट्र सेवाचे अधिकारी आहेत. त्यांना दीड वर्षापूर्वी भारतीय प्रशासक सेवेत पदोन्नती देण्यात आली. त्यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त पदावर कार्य केले आहे. त्यांच्याकडे मदत डेअरी आणि वनामतीचाही प्रभार होता. वर्षभरापूर्वी महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त पदावर त्यांनी नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांना जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आली. जिल्हाधिकारी हे पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून ठाकरे यांची बदली करण्यात येत असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढलेल्या आदेशात नमूद आहे. ठाकरे यांनी सायंकाळच्या सुमारास पदभारही स्वीकारला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ravindra Thackeray New Collector