esakal | VIDEO : आई-बाप झालो म्हणून गगनात मावत नव्हता आनंद, पण एका रात्रीत झालं होत्याचं नव्हतं
sakal

बोलून बातमी शोधा

reaction of parents who lost their child in bhandara fire incident

ज्यांनी अजून जगही पाहिलं नव्हतं, त्याच दहा बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. काहींना आपल्या काळजाच्या तुकड्याचा चेहराही पाहायला मिळाला नाही.

VIDEO : आई-बाप झालो म्हणून गगनात मावत नव्हता आनंद, पण एका रात्रीत झालं होत्याचं नव्हतं

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भंडारा : लग्नानंतर सुखाचा संसार सुरू झाला. संसाराच्या वेलीवर फुले उमलणार या सुखाच्या क्षणाने मनात आनंदाचे उकळ्या फुटत होत्या. प्रसुतीच्या कळा सुरू झाल्या. रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुखरुप प्रसुती पार पडली. बाळाचा गोंडस चेहराही बघितला. पण, साखर झोपेत असताना अचानक आग लागली अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. ज्यांनी अजून जगही पाहिलं नव्हतं, त्याच दहा बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. काहींना आपल्या काळजाच्या तुकड्याचा चेहराही पाहायला मिळाला नाही. त्यामुळे दुर्दैवी बालकांच्या मातांनी टाहो फोडला. त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा -Live Updates भंडारा जिल्हा नवजात शिशू दुर्घटना : आगप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तात्काळ...

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये नवजात केअर युनिटच्या अतिदक्षता विभागात आग लागल्यामुळे दहा नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारच्या मध्यरात्री  अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ( SNCU ) आग लागल्यामुळे दहा नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  शनिवारच्या मध्यरात्री जवळपास दोन वाजण्याच्या दरम्यान ही आग लागली असून 17 बालकांपैकी 7 बालकांना वाचविण्यात यश आलेले आहे.

हेही वाचा - Breaking News : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग;...

शनिवारी रात्रीच्या दरम्यान अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बार्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितला असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यामुळे त्यांनी लगेच रुग्णालयातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचून रुग्णालयातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. मॉनिटरमध्ये असलेले सात बालक वाचविण्यात आले, तर आऊट बॉर्न युनिटमधील 10 मुलांचा मृत्यू झाला.

संपादन - भाग्यश्री राऊत


 

loading image
go to top