अकोल्यात रोजगार मेळाव्यात तीन हजार पदांसाठी भरती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

अकोला  ः अकोला, वाशिम व बुलडाणा या जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल महाविद्यालय, सिव्हिल लाईन्स, अकोला येथे गुरुवार, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यात ४४ कंपन्याचा सहभाग राहणार असून, सुमारे अंदाजे ३ हजार पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या मेळाव्याचे उद्‍घाटन राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. या मेळाव्याला पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

या मेळाव्यात प्लॉट इंडिया अॅटोमोबाईल्स, एलटीडी(बारामती), कॉ्स्मोइंटरनॅशनल इंडिया प्रा.लि, टाटा अॅटोकॉम्प बॅटरी प्रा.लि, फ्ल्यॅश विव्हन मॅचिंग टेक्नॉलॉजी प्रा.लि, इंड्युरन्स कंपनी प्रा.लि., डेल्फी ऑटोमोटिव्ह सिस्टिम प्रा.लि. (कात्रज), विस्मी मोई, चौगुले इंडस्ट्रिज प्रा. लि, यशवंतराव टेक्निकल अॅण्ड ट्रेनिंग फाऊंडेशन, पायजिओ व्हेयिकल प्रा.लि, ऑटोमाटिव्ह मॅन्युफॅक्चर प्रा.लि, महिंद्रा व्हेईकल एमएफजी लि. (चाकन), इतर १७९३ यांचा सहभाग राहणार आहे.  या भव्य रोजगार मेळाव्यात पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येवून त्याच दिवशी निवड करण्याचे नियोजन केलेले आहे. 

या रोजगार मेळाव्यात आपल्या विभागातील हजारो सुशिक्षीत बेरोजगारांना नोकरीची संधी प्राप्त होणार आहे. अकोला, वाशिम व बुलडाणा येथील इच्छुक उमेदवारांनी आपल्या शहर व तालुक्यातील शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी आपल्या नावाची नोंदणी ३ ऑक्टोबरपर्यंत करुन टोकन प्राप्त करून घ्यावे आणि ४ ऑक्टोबर रोजी शैक्षणिक पात्रता व संबंधित मूळ कागदपत्रे व त्यांच्या सत्यप्रतीसह अकोला येथे मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहावे. या संधीचा जास्तीत जास्त सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: Recruitment of 3,000 posts of various companies in Akola's Employment Meet