महाप्रसादासाठी नोंदणी करा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर ः आठवड्यावर आलेल्या बाप्पाच्या आगमनासाठी कार्यकर्त्यांची सार्वजनिक मंडळाच्या नोंदणीसाठी लगबग सुरू झाली आहे. भाविकांसाठी महाप्रसाद वितरणाची योजनाही आखली आहे. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे मंडळांकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. सोबतच 15 नियमावलीचे सर्वांनाच पालन करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून जनजागृती करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवात प्रसादाची चंगळ असते. यासाठी शहरातील हलवाईही तयारी लागले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते मंडळाच्या नोंदणीसाठी धावपळ करीत आहेत. मंडळाच्या नोंदणीसोबतच आता प्रसाद वितरणासाठी अन्न व औषधे प्रशासनाची परवानगी घेऊन त्यांच्याकडे नोंद करणे अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्र सरकारने 2012 मध्ये लागू केलेल्या अन्नसुरक्षा व मानके कायद्यांतर्गत सार्वजनिक ठिकाणी प्रसाद वितरण करण्यासंबंधी बिंदूची नियमावली निश्‍चित केली आहे. त्याचे कडक पालन करणे बंधनकारक आहे. सुरक्षित व सुयोग्य प्रसाद वितरणाच्यादृष्टीने या तरतुदी महत्त्वाच्या मानल्या जातात. याचा अंतिम फायदा भक्तांनाच होईल. अखेर नियमांच्या अधीन राहून प्रसाद वितरण केल्यास सणाचा आनंद द्विगुणित करता येईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
----
प्रसादातून विषबाधेसारखी अप्रिय घटना घडू नये अशी काळजी मंडळानी घ्यावी. यासाठी मोठ्या मंडळाना सूचना देण्यात येणार आहेत. हे टाळण्यासाठी चौकस राहा आणि नोंदणी करा असे आवाहन करणार आहे.
- शशिकांत केंकरे
सहाय्यक आयुक्त (अन्न)

मंडळांसाठीचे महत्त्वाचे नियम
प्रसाद करण्याची जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी, प्रसादासाठी लागणारा माल हा परवानाधारक अथवा नोंदणीकृत व्यापाराकडूनच घ्यावा, प्रसादाची भांडी स्वच्छ व झाकण असलेली असावीत, फळे सडलेली नसावीत व परवानाधारक फळविक्रेत्याकडूनच घ्यावीत. आवश्‍यक तेवढाच प्रसाद तयार करावा. प्रसादासाठीचे पाणी पिण्यायोग्य असावे. प्रसाद तयार करणाऱ्याला ऍप्रन, ग्लोव्हज, टोपी पुरवली जावी. दूध अथवा दुग्धजन्य पदार्थ हे थंड राहतील असे कमी तापमानावरच साठवणुकीस ठेवावेत. मावा व खोव्याची वाहतूक रेफ्रिजरेटरमधून करावी. प्रसाद उत्पादन व वितरण करणारा स्वयंसेवक हा कुठल्याही संसर्गजन्य रोगापासून मुक्त असावा. जुना, शिळा अनेक दिवस कोल्ड स्टोरेजमध्ये साठवलेला खवा प्रसादासाठी वापरू नये. अन्न सुरक्षा अधिकारी असल्यास एक जबाबदार व्यक्ती नेमून त्यास संपूर्ण सहकार्य करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com