तरुणाच्या मृत्यूने रुग्णालयाची तोडफोड; नातेवाइकांनी व्यक्त केला संताप

Relatives of dead patients attacked on doctor and hospital in Yavatmal
Relatives of dead patients attacked on doctor and hospital in Yavatmal

वणी (जि. यवतमाळ) : येथील दीपक चौपाटी परिसरात डॉ. पद्माकर मत्ते यांच्या रुग्णालयात रंगनाथनगर परिसरातील तरुण उपचारासाठी आला होता. त्याच्यावर उपचार करण्यात आले. परंतु प्रकृती अस्वस्थतेमुळे तो येथील खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल झाला. त्याचा मृत्यूमुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी डॉ. मत्ते यांच्या रुग्णालयाची तोडफोड केली.

आकाश हनुमान पेंदोर (वय 21), असे मृताचे नाव आहे. तो नेहमी डॉ. मत्ते यांच्या रुग्णालयात उपचारासाठी येत होता. प्रकृती बरी वाटत नसल्याने तो डॉ. मत्ते यांच्या रुग्णालयात उपचारासाठी गेला होता. डॉक्‍टरांनी त्याला इंजेक्‍शन दिले. यानंतर तो घरी गेला. 

प्रकृती खालावल्यामुळे त्याला खासगी मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. तरुणाच्या झालेल्या मृत्यूने संतापलेल्या नातेवाइकांनी आक्रमक पावित्रा घेत डॉ मत्ते यांनीच उपचारात कसूर केल्याचा आरोप करीत रुग्णालयाची तोडफोड केली. 

रुग्णालयात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. मात्र, नातेवाइक ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते. वृत्तलिहेस्तोवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com