esakal | तिनं बोलवलं अन् नातेवाईकांनी चोपलं; विवाहितेशी चॅटिंग आलं युवकाच्या अंगाशी 
sakal

बोलून बातमी शोधा

Relatives of married woman beat man because of chatting in Amravati

राजापेठ ठाण्याच्या हद्दीत बडनेरा मार्गावर, एका मॉलसमोर शुक्रवारी (ता.15) दुपारी ही घटना घडली. एका विवाहितेच्या मोबाईलवर चुकीने मिसकॉल आला. तिने खात्री करण्यासाठी त्या क्रमांकावर संपर्क केला असता, हा भ्रमणध्वनी युवकाचा असल्याचे लक्षात आले

तिनं बोलवलं अन् नातेवाईकांनी चोपलं; विवाहितेशी चॅटिंग आलं युवकाच्या अंगाशी 

sakal_logo
By
संतोष ताकपिरे

अमरावती :  काही दिवसांपासून तो विवाहितेसोबत चॅटिंग करीत होता. पाणी डोक्‍यावरून जात असल्यामुळे तिने पतीला माहिती दिली. पतीने पत्नीच्या मोबाईलवरुन त्याला भेटीसाठी बोलविले. पाळत ठेवून असलेल्या नातेवाइकांनी भेटीसाठी आलेल्या युवकास भर रस्त्यात चोपले.

राजापेठ ठाण्याच्या हद्दीत बडनेरा मार्गावर, एका मॉलसमोर शुक्रवारी (ता.15) दुपारी ही घटना घडली. एका विवाहितेच्या मोबाईलवर चुकीने मिसकॉल आला. तिने खात्री करण्यासाठी त्या क्रमांकावर संपर्क केला असता, हा भ्रमणध्वनी युवकाचा असल्याचे लक्षात आले. तिने रॉंग नंबर म्हणून फोन ठेवला. परंतु युवकाने एका मित्राच्या मोबाईलनंबरवरुन त्याच महिलेशी पुन्हा संपर्क केला. 

अधिक माहितीसाठी - मन सुन्न करणारं वास्तव! जीवाचं रान करून वाढवलेल्या जीवांना खड्ड्यात पुरण्याची आली वेळ

दोघांमध्ये बरेच दिवस चॅटिंग सुरू होती. परंतु पाणी डोक्‍यावरून जायला लागले. युवकाच्या डिमांड वाढत गेल्या. महिलेने घटनेची माहिती पतीला दिली. पतीने पत्नीचा पाठलाग करणा-या युवकाला धडा शिकविण्याचे ठरविले. विवाहितेच्या मोबाईलवरुन पतीने चॅटिंग सुरू केली. त्या युवकाला भेटीसाठी बडनेरा मार्गावरील एका मॉलसमोर शुक्रवारी (ता.15) बोलविले. ती भेटीसाठी येणार या आशेने तो प्रफुल्लीत होता. युवक पोचला. पतीने पुन्हा पत्नीच्या मोबाईलवरुन फोन केला. तो फोन युवकाने रिसीव्ह केला. त्यानंतर आधीपासूनच पाळत ठेवून असलेल्या महिलेच्या पतीसह निकटवर्तीयांनी त्या युवकाची पिटाई केली. 

त्यानंतर पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्षाने राजापेठ पोलिसांना कळविले. पोलिसांनी मॉलसमोर जाऊन त्या युवकास ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. चौकशी दरम्यान त्याने महिलेसोबत पहिल्यांदा संपर्कासाठी वापरलेला मोबाईल मित्राचा असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या युवकाच्या मित्रालाही ठाण्यात बोलविले. परंतु तो अखेर महिलेचा नातेवाईक निघाला. त्यामुळे युवकास समज देऊन सोडण्यात आले.

नक्की वाचा - नवनीत राणांनी घेतला उखाणा अन् उपस्थितांच्या तोंडी एकच वाक्य 'वाह वाह क्या बात है!'

तिच्यासोबत तो चॅटिंग करीत होता. ते सर्वच नंतर एकमेकांचे नातेवाईक असल्याची बाब चौकशीअंती पुढे आली. महिलेनेही तक्रार नोंदविली नाही.
-किशोर शेळके, 
दुय्यम पोलिस निरीक्षक, राजापेठ ठाणे. 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image