...तर धार्मिक हुकूमशाही येईल - ॲड. प्रकाश आंबेडकर

Prakash-Ambedkar
Prakash-Ambedkar

गोंदिया - गेल्या साडेचार वर्षांत बाबासाहेबांच्या फक्त नावाचा उदो उदो होताना दिसला; पण त्यांच्या विचारांचा उदो उदो मात्र कुठेच होताना दिसून आला नाही. आरएसएसवाले गावागावांत फिरून पहिल्यांदाच हिंदू राष्ट्र करण्याची संधी मिळाली असल्याचे सांगत सुटले आहेत. देशाचे संविधान संत तुकाराम महाराजांच्या विचारांनी प्रेरित आहे. म्हणून आरएसएसला हे संविधान नको आहे, असे प्रतिपादन भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गोंदियातील भीमनगर मैदानात गुरुवारी आयोजित सभेत केले. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले, देशात पुन्हा मोदीची सत्ता आली तर, वेगळ्या प्रकारची धार्मिक हुकूमशाही येण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत वंचित राहिलेल्या वर्गाला प्रतिष्ठा, मान-सन्मान मिळविण्याकरिता व्यवस्था आपल्या ताब्यात घेणे गरजेचे आहे. आरएसएस व भारतीय जनता पक्ष हे धार्मिक हुकूमशाहीचे प्रतीक आहेत. ही हुकूमशाही विचारांची असून लादली जात आहे. हे सरकार परत आले तर तुम्हाला हे कैदी केल्याशिवाय राहणार नाही. नोकरी संपविली जात आहे, तुम्हाला कामगार करून ठेवण्याचे यांचे धोरण आहे.

आरएसएसला संविधानाच्या चौकटीमध्ये घेणार, अशी केवळ घोषणा करून चालणार नसून काँग्रेसतर्फे तसा ड्राफ्ट द्यावा, अशी मागणी आपण केली होती. मात्र, अद्याप यावर काँग्रेसतर्फे कुठलाही निर्णय न घेतल्याने आगामी लोकसभा निवडणूक पाहता आता वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे मोठ्या प्रमाणावर सभा घेण्यात येत आहेत, असे आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com