
शोले चित्रपटातील जय म्हणजेच अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती. ही घटना लक्षात ठेवून कालिया डब्बल सिंहला सांगतो की, तुम्हाला पकडण्यासाठी आलेल्या ‘जय’लाबी कोरोना झाला, तुम्हाला तर पाच पंचवीस गावातील लोकच घाबरतात. मात्र, या कोरोनाला संपूर्ण जग घाबरत आहे. हे ऐकताच डब्बल सिंहची बोलतीच बंद होते.
यवतमाळ : शोले चित्रपटाचे नाव येताच सर्वप्रथम डोळ्यासमोर उभा राहतो गब्बरसिंग. १९७५ मध्ये आलेल्या चित्रपटाचे गारूड अजूनही कायम आहे. या चित्रपटातील डायलॉग आजही कित्येकांच्या तोंडपाठ आहे. यवतमाळच्या मातीत ‘शोले’चा रिमेक अर्थात लघूपटाची निर्मिती झाली. लघूपटात निखळ मनोरंजन असले तरी कोविडमुळे ‘डाकू डब्बल सिंहची बोलती बंद’ झाली आहे.
‘डाकू डब्बल सिंह झाला अक्कल सिंह’, असे लघूपटाचे नाव आहे. या लघुपटाचे निर्माता दिग्दर्शक तथा लेखक आनंद कसंबे आहेत. चित्रीकरण यवतमाळपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या एका बंद पडलेल्या दगड खाणीत झाले होते. शोले चित्रपटातील गब्बर सिंह हा त्याच्या तीन साथीदारांना रामगडला लुटमार करण्यासाठी पाठवतो. मात्र, ते काही कारणाने रिकाम्या हाताने परत येतात. तेव्हा गब्बर सिंह त्यांच्यावर खूप चिडतो.
‘इसकी सजा मिलेगी जरूर मिलेगी’, असा दम देणारा डॉललॉग ठोकतो. हे दृष्य प्रत्येक रसिकांच्या मनात घर करून आहे. याच दृष्यावर आधारित अत्यंत चपखल बसणारा शोले लघुपट यवतमाळ सारख्या ग्रामीण भागात तयार झाला आहे. डाकू गब्बर सिंहचे वऱ्हाडी स्वरूप असलेला हा डब्बल सिंह कोरोना संकटापासून वाचविण्यासाठी जनजागृती करीत आहे.
शोले चित्रपटातील जय म्हणजेच अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती. ही घटना लक्षात ठेवून कालिया डब्बल सिंहला सांगतो की, तुम्हाला पकडण्यासाठी आलेल्या ‘जय’लाबी कोरोना झाला, तुम्हाला तर पाच पंचवीस गावातील लोकच घाबरतात. मात्र, या कोरोनाला संपूर्ण जग घाबरत आहे. हे ऐकताच डब्बल सिंहची बोलतीच बंद होते.
सविस्तर वाचा - अफलातून; शिक्षक उमेदवारानी लावली शर्ट बनियानवर लग्नसंमारंभात हजेरी
कलावंत ग्रामीण व शहरी भागातील असून, काही तर झोपडपट्टीत राहणारे आहेत. यातील एक कलावंत सुधाकर धोंगडे नळ दुरुस्तीच काम करणारा आहे. जनार्दन राठोड हे शेतकरी आहेत. डाकू डब्बल सिंहची भूमिका पुसद येथील के. गणेशकुमार यांनी केली आहे. कालियाची भूमिका गजानन वानखडे झोपडपट्टीत राहणाऱ्या कलावंताने केली आहे. प्रशांत बनगीनवार, विलास पकडे, पंडित वानखडे, प्रशांत खोरगडे, वसंत उपगनलावार, पवन भारसकर, प्रमोद पेंदोर, रूपेश रामटेके या कलावंतांनी आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे.
या लघुपटाचे चित्रीकरण युवा छायाचित्रकार करण पेनोरे याने केले आहे. विशेष म्हणजे करणने तंत्रनिकेतनमध्ये शिकत असतानाच त्याला चित्रपटाच्या शूटिंगची आणि संकलनाची आवड निर्माण झाली. मात्र, त्याच्या घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे तो या कोर्ससाठी साडेतीन लाख रुपये शुल्क देऊ शकला नाही. गुगलला गुरू मानत तंत्रज्ञान आत्मसात केले. नागपूर येथील ज्या संस्थेने त्याला या कोर्ससाठी साडेतीन लाख रुपये मागितले होते. तीच संस्था आता करणाला गेस्ट लेक्चरसाठी बोलावत आहे.
हजारो लोकांनी बघितला लघूपट
कोरोनाच्या काळात लोकांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी ‘आनंदयात्रा’ ही हास्यमालिका निर्माण तयार केली. आतापर्यंत हा लघुपट हजारो लोकांनी बघितला असून, कौतुक करण्यात येत आहे.
- आनंद कसंबे
निर्माता तथा लेखक, यवतमाळ
संपादन - नीलेश डाखोरे