महाल, इतवारीतील 50 अतिक्रमण काढले

File photo
File photo

नागपूर  : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज महाल, इतवारीतील 50 अतिक्रमणे हटविली. केळीबाग रोड रुंदीकरणात अडथळा ठरत असलेले घराचे अतिक्रमणही यावेळी काढण्यात आले.
अतिक्रमण विभागाने रस्त्यावरील हातठेले, दुकानांच्या विरोधात तीव्र कारवाई केली. केळीबाग रोडवरील निरंजन दलाल यांचे घर तोडून रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा केला. गणेशपेठ पोलिस स्टेशनअंतर्गत चिटणीस पार्क ते मेयो हॉस्पिटल, फवारा चौक, श्‍याम टॉकीज परिसरातील दुकानाचे अतिक्रमण काढण्यात आले. यासह सेंट्रल एव्हेन्यू, दर्शन टॉवर येथील एक ट्रक साहित्य जप्त केले. कोतवाली पोलिस स्टेशनअंतर्गत अग्रसेन चौक ते चिटणीस पार्क, बडकस चौक, फवारा चौक रस्त्यावरील दोन्ही बाजूंचे दुकान, हातठेले हटविण्यात आले. तहसील पोलिस स्टेशनअंतर्गत नंगा पुतळा, तीन नल चौक, शहीद चौक, सराफा ओळ, गांधी पुतळा चौक रस्त्यावरील अवैध दुकाने हटविण्यात आले. या परिसरातून दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईदरम्यान कोतवाली, तहसील, गणेशपेठ पोलिस स्टेशनच पोलिस उपस्थित होते. अतिक्रमण विभाग सहायक आयुक्त अशोक पाटील, संजय कांबळे यांनी कारवाई केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com