कार्यकर्त्यांच्या ओठांवर नामांतराचे विजय गीत

केवल जीवनतारे - सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

नागपूर - ‘मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळालेच पाहिजे,’ अशी गर्जना करणाऱ्या कार्यकर्त्यांचा नामांतर आंदोलन ‘श्‍वास’ होता. नामांतरासाठी पेटलेल्या वणव्यात २७ भीमसैनिक शहीद झाले. अडीच हजार आंबेडकरी कुटुंब उद्‌ध्वस्त झाले. परंतु, आयुष्य उद्‌ध्वस्त झालेल्या कार्यकर्त्यांच्या ओठांवर आजही नामांतराचे विजयगीत आहे. 

नागपूर - ‘मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळालेच पाहिजे,’ अशी गर्जना करणाऱ्या कार्यकर्त्यांचा नामांतर आंदोलन ‘श्‍वास’ होता. नामांतरासाठी पेटलेल्या वणव्यात २७ भीमसैनिक शहीद झाले. अडीच हजार आंबेडकरी कुटुंब उद्‌ध्वस्त झाले. परंतु, आयुष्य उद्‌ध्वस्त झालेल्या कार्यकर्त्यांच्या ओठांवर आजही नामांतराचे विजयगीत आहे. 

नामांतर आंदोलनातील आंबेडकरी चळवळीची संघटित शक्ती पुन्हा उभी राहावी, अशी भावना आंबेडकरी उजेडाचे वारसदार असलेल्या कार्यकर्त्यांची आजही आहे. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव २७ जुलै १९७८ रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत संमत झाला. परंतु, बाबासाहेब ज्यांना कधीच पचला नाही, अशांनी मराठवाड्यातून विरोध सुरू केला. या निर्णयाची अंमलबजावणी होणार नसल्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांचे प्रवक्‍ते एस. एम. जोशी यांनी सांगितले. यामुळे आंबेडकरी चळवळीतील ‘निखारे’ पेटून उठले. नामांतराच्या अंमलबजावणीसाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन सुरू केले. कार्यकर्त्यांनी महाडच्या चवदार तळ्यातील पाणी विद्रोह करून प्राशन केले आणि आंदोलन सुरू केले. नागपूर ते औरंगाबाद असा प्रा. जोगेंद्र कवाडे सरांचा ‘लाँग मार्च’ निघाला. १९७८ नंतर तब्बल १६ वर्षांनी १४ जानेवारी १९९४ रोजी नामविस्ताराची अंमलबजावणी झाली. जोपर्यंत आंबेडकरी चळवळीचे आंदोलन जिवंत आहे, तोपर्यंत आंबेडकरी समाज ताठ मानेनेच जगेल. ज्या दिवशी आंदोलन संपेल तो दिवस घातक ठरेल, अशा इशारा आंबेडकरी चळवळीतील कवी ई. मो. नारनवरे यांनी दिला होता. 

भीमनगरात अश्रुधुराचे नळकांडे
प्रा. कवाडेंचा लाँग मार्च, दक्षिण नागपुरात पोलिसांनी दलितांच्या बॅरेक परिसर, जोगीनगर, भीमनगरात अश्रुधुराचे नळकांडे फेकले असताना ते झेलून पुन्हा पोलिसांकडे भिरकावणाऱ्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इतिहास डोळ्यांत साठवला आहे. पश्‍चिमचे आंदोलन ॲड. विमलसूर्य चिमणकर, प्रकाश कुंभे, उत्तरचे आंदोलन प्रा. रणजित मेश्राम, ताराचंद्र खांडेकर, ई. मो. नारनवरे, उपेंद्र शेंडे यांच्यापासून रात्री मशाल मोर्चा काढणारे अनिल वासनिक यांनी लढविले. माजी आमदार शेंडेंचे उपोषण ‘लाँग मार्च’नंतरचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. दक्षिणेच्या आंदोलनात भूपेश थुलकर, दादाकांत धनविजय, अमर रामटेके, पुरण मेश्राम, सुधाकर सोमकुंवर, मधू दुधे, विलास पाटील, बाळू हिरोळे, सुनील लामसोंगे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Renamed Anniversary Special