अमरावती ब्रेकिंग : कोरोना बाधितांचा आकडा पोहोचला 333 वर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

अमरावतीतही दररोज सात ते आठ रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी काही संपलेली नाही. अनेक उपाययोजन सुरू असतानाही रुग्ण वाढत असल्याने ताण कायमच आहे. रविवारचा दिवस उजाळत नाही तोच नऊ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आणखी चिंता वाढली आहे.

अमरावती : विदर्भात नागपूर व अकोला कोरोना रुग्णांमध्ये आघाडीवर आहे. येथे मोठ्या प्रमाणात रुगण आढळून येत आहेत. यामुळे प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे. असे असताना विदर्भातील अमरावती जिल्हा या दोन जिल्ह्यांचा पाठलाग करीत असल्याचे दिसून येते. अमरावतीत रुग्ण वाढत असल्याने बाधितांचा आकडा 333 वर पोहोचला आहे. रविवारी जिल्ह्यात नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. 

विदर्भातील नागपूर व अमरावती जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहे. नागपुरात तर हजाराचा आकडा पार करण्यासाठी फक्‍त चाळीस रुग्णांची गरज आहे. अशीच स्थिती अकोला जिल्ह्याचीही आहे. अकोल्यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. त्या तुलनेत नागपुरात मात्र मृत बाधितांचा आकडा कमी आहे. असे असले तरी चिंता काही कमी नाही. 

अमरावतीतही दररोज सात ते आठ रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी काही संपलेली नाही. अनेक उपाययोजन सुरू असतानाही रुग्ण वाढत असल्याने ताण कायमच आहे. रविवारचा दिवस उजाळत नाही तोच नऊ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आणखी चिंता वाढली आहे.

काय आहे या लिंकमध्ये? - बापरे! विलगीकरणात महिलेला आली पाळी, संबंधिताने सॅनिटरी पॅड ऐवजी दिले हे...

बाधितांमध्ये बडनेरा येथील जुनीवस्ती भागातील सहा, चांदुरबाजार तालुक्‍यातील दोन व रुख्मिणीनगरातील एका जणाचा समावेश आहे. यामध्ये दोन महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. त्यामुळे अमरावतीत अद्याप आढळलेले एकूण रुग्ण 333 झाले आहेत. दुसरीकडे मृतांचा आकडाही वाढलेला आहे. मृतांच्या बाबतीत अमरावती नागपूरच्या पुढे आहे. यामुळे यात कोण आघाडीवर राहतो आता हेच पाहणे बाकी आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reports of nine patients came positive on Sunday morning at Amravati